हेच का आपले प्रजासत्ताक ? केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेतलं असतं तर….

केंद्रातील सरकारने एक पाउल मागे घेतले असते तर आज राजधानीतील प्रजासत्ताक दिनाच संचलन आणि शेतकऱ्यांचा आक्रोश एकाच वेळी दिसला नसता, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून केंद्रावर निशाणा साधण्यात आला आहे.

हेच का आपले प्रजासत्ताक ? केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेतलं असतं तर....
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 6:57 AM

मुंबई : आज 72 वा प्रजासत्ताक दिन आहे. पण कोरोनाच्या या जीवघेण्या संसर्गामुळे आजच्या दिवसावरही मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. यंदा प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली. यावरूनच सामनाच्या अग्रलेखातून केंद्रावर आणि मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. केंद्रातील सरकारने एक पाउल मागे घेतले असते तर आज राजधानीतील प्रजासत्ताक दिनाच संचलन आणि शेतकऱ्यांचा आक्रोश एकाच वेळी दिसला नसता, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून केंद्रावर निशाणा साधण्यात आला आहे. (shivsena saamana editorial on republic day of india farmers protest and central government)

‘नोटाबंदी, जीएसटी आणि लाँकडाउन यामुळे देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या मनातही आक्रोश आहेच. रशियासारख्या पोलादी देशातील जनताही तेथील राजवटीच्या विरोधात माँस्कोच्या रस्त्यावर उतरलीच, हे समजुन घ्यायला हवे. आज आपल्या देशाच्या राजधानीत शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. त्याच्या पाठिंब्यासाठी राज्यराज्यांच्या राजधानीतही शेतकऱ्यांचे धडक मोर्चे निघत आहेत. हे चित्र बरे नाही, उद्या हा वणवा आणखीही पसरु शकतो. हे खरेच प्रजासत्ताक आहे का ?’ असा थेट सवाल करत कृषी कायदा आणि शेतकरी आंदोलनावरून केंद्राच्या भूमिकेवर टीका करण्यात आली आहे.

आज देशाचा 72 वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र साजरा होणार आहे. पण यावरही कोरोनाचं सावट असणार आहे. एकीकडे चीनच्या कुरापतींचं सावट असणार आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा आक्रोष आणि तणावदेखील असणार आहे. यामुळे दिल्लीच्या सोहळ्यावर याचा मोठा परिणाम जाणवेल असं सामनातून लिहिण्यात आलं आहे. यावेळी सामनातून कोरोनामुळे आजच्या कार्यक्रमावर होणाऱ्या परिणामांवरही लिहिण्यात आलं आहे.

दरम्यान, ज्या पद्धतीने कोरोनाचा परिणाम अद्याप कायम आहे. तसेच ज्या जनतेचे हे ‘प्रजासत्ताक’ आहे त्या जनतेचे अनेक प्रश्न 72 व्या प्रजासत्ताक दिनीही कायमच आहेत. मागील सात दशकांत देशाची प्रगती नक्कीच झाली. त्या प्रगतीचे लाभ जनतेलाही झालेच, पण ते किती लोकांना झाले? कोणत्या वर्गाला झाले? असा थेट सवाल शिवसेनेकडून केंद्राला विचारण्यात आला आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमावरही टीका करण्यात आली आहे. ‘‘करोडपतीं’चीही संख्या वाढली, पण गरीब अधिक गरीब झाला हेदेखील खरेच. देशातील शेतकरी आणि सामान्य जनता जेथे सुखी आणि सुरक्षित असते तो देश खरा प्रजासत्ताक म्हणता येतो. आपल्या देशाला खरेच तसे म्हणता येईल का? पुन्हा या प्रश्नांची उत्तरे ज्यांनी द्यायची ते नेमके अशा प्रश्नांवर काहीच बोलत नाहीत. त्यांच्या ‘मन की बात’मध्ये हे ज्वलंत मुद्दे येत नाहीत.’ अशी टीका करण्यात आली आहे. (shivsena saamana editorial on republic day of india farmers protest and central government)

संबंधित बातम्या –

Republic Day: राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचा देखणा चित्ररथ; व्हिडीओ पाहिलात का?

Padma Awards | पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील ‘या’ व्यक्तींचा पद्म पुरस्काराने सन्मान

Republic Day 2021 PHOTO : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर तिरंग्याचा साज

(shivsena saamana editorial on republic day of india farmers protest and central government)

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.