‘हाऊज द जोश? हाय सर…’, विकी कौशलचा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ (Uri: The Surgical Strike) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:04 AM, 26 Jan 2021
'हाऊज द जोश? हाय सर...', विकी कौशलचा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ (Uri: The Surgical Strike) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील ‘हाऊज द जोश’ हा डायलॉग आजपण प्रत्येकाच्या तोंडावर आहे. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. आणि या चित्रपटाला लोकांनी उदंड प्रतिसाद देखील मिळाला होता. या चित्रपटामधील विक्की कौशलच्या दमदार अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले होते. आता बातमी अशी आहे की, हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये रिलीज होत आहे. 26 जानेवारीच्या निमित्ताने हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होत आहे. (The movie ‘Uri: The Surgical Strike’ will be released again today)

तरण आदर्श यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, “त्याच थिएटरमध्ये परत येत आहे ज्याने 2019 मध्ये लोकांची मने जिंकली. मुंबई, पुणे, कोलकाता, नोएडासह देशातील 29 शहरांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी हा चित्रपट कारगिल विजयदिनी महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला आतापर्यंत चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये बेस्ट डायरेक्शन, बेस्ट ऑडियोग्राफी, बेस्ट म्युझिक डायरेक्शन आणि बेस्ट अ‍ॅक्टर यांचा समावेश आहे.
‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’

हा चित्रपट 2016 साली जम्मू-काश्मीरमधील उरी बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत आहे. यात अभिनेता विकी कौशल, अभिनेते परेश रावल, अभिनेत्री यामी गौतम हे मुख्य भूमिकेत आहेत. भारतीय सैन्याच्या उरी बेस कॅप्मवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 18 सप्टेंबर 2016 रोजी भ्याड हल्ला केला होता. यात भारताचे 19 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. याच सर्जिकल स्ट्रईकवर हा चित्रपट आहे.

संबंधित बातम्या : 

Posco Act Case : लैंगिक अत्याचारासंबंधी न्यायालयाच्या त्या निर्णयावर रितेशची उघड-उघड नाराजी, म्हणतो….

RRR Poster Out | वर्षातल्या सगळ्यात मोठ्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज, या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार!

(The movie ‘Uri: The Surgical Strike’ will be released again today)