Kapil Sharma | खरोखरच ‘कपिल शर्मा’कडे बायकोला गिफ्ट देण्यासाठी पैसे नाहीत?

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतो. तो आपल्या चाहत्यांसाठी मजेदार फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. तसेच तो चाहत्यांसोबत विविध विषयावर चर्चा देखील करतो. कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांच्या लग्नाला आज दोन वर्षेपूर्ण झाली आहेत. मात्र त्यांच्या लग्नाच्या वाढदिवस आहे, तरी देखील कपिलला काम करावे लागत आहे. याचा कपिलने सेटवरून […]

Kapil Sharma | खरोखरच 'कपिल शर्मा'कडे बायकोला गिफ्ट देण्यासाठी पैसे नाहीत?
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 6:28 PM

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतो. तो आपल्या चाहत्यांसाठी मजेदार फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. तसेच तो चाहत्यांसोबत विविध विषयावर चर्चा देखील करतो. कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांच्या लग्नाला आज दोन वर्षेपूर्ण झाली आहेत. मात्र त्यांच्या लग्नाच्या वाढदिवस आहे, तरी देखील कपिलला काम करावे लागत आहे. याचा कपिलने सेटवरून एक फोटो शेअर केला. (Kapil Sharma has no money to give as a gift to his wife)

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

फोटो शेअर करताना कपिलने लिहिले आहे की, सॉरी बेबी गिन्नी मी आपला लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीही सेटवर आहे. भेट वस्तू द्यायची म्हणल्यावर काम तर करावेच लागणार ना, तेव्हाच पैसे मिळतील आणि भेट वस्तू देऊ शकेल, पुढे कपिल म्हणाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खूप प्रेम, संध्याकाळी भेटू कपिलची ही पोस्ट त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. हा फोटो काही मिनिटांत लाखो लोकांना आवडला आहे. फोटोत कपिल आरश्यासमोर जॅकेट घालून उभा दिसत आहे. अलीकडेच कपिल शर्माने मुलगी अनायरा पहिला वाढदिवस साजरा केला. सेलिब्रेशनची काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली होती. या फोटोतमध्ये अनायरा एकदम गोंडस दिसत आहे. एक फोटोमध्ये ती आपल्या आजीसोबत पोज देत आहे, दुसर्‍या फोटो ती वाढदिवसाचा केक हातात घेतलेली दिसत आहे. त्यांनी लिहिले, ‘आमच्या लाडोच्या पहिल्या वाढदिवशी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद

कॉमेडियन कपिल शर्मा टीव्ही इंडस्ट्रीचे एक प्रसिद्ध नाव आहे. त्याने केवळ टेलिव्हिजनवर आपली क्षमता सिद्ध केली नाही, तर बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही तो खूप लोकप्रिय आहे. कपिल लवकरच वेब सीरिजच्या माध्यमातून डिजिटलमध्ये पदार्पण करणार आहे, याची चर्चा सर्वत्र आहे. कपिल त्याच्या डिजिटल पदार्पणासाठी 20 कोटी रुपये घेत असल्याचे अलिकडेच कृष्णा अभिषेकने सांगितलं. मात्र तो एक विनोद असल्याचे नंतर सांगण्यात आले.

परंतु कपिल शर्मा डिजिटलमध्ये पदार्पणासाठी एवढी मोठी रक्कम घेणार आहे. हे ऐकल्यावर अनेकांना धक्काच बसला. कपिल शर्माच्या अनेक चाहत्यांनी याबद्दल कपिलला विचारण्याचा प्रयत्नही केला, मात्र कपिलकडून कोणतेही उत्तर मिळू शकले नाही. कपिल शर्मा त्याच्या डिजिटल पदार्पणासाठी खरोखरच २० कोटी घेणार आहे का? याचे कुतूहल मात्र त्याच्या चाहत्यांना अजूनही आहे.

संबंधित बातम्या :

Akshay Kumar | ‘लक्ष्मी’च्या प्रमोशनसाठी अक्षय आणि कियाराची ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये हजेरी!

Laxmii | खिलाडी कुमारला ‘बॉयकॉट’चा धसका, अखेर ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव बदलले!

(Kapil Sharma has no money to give as a gift to his wife)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.