Takht | करण जोहरचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट रद्द, वाचा नेमकं काय घडलं!

चित्रपट निर्माता करण जोहरने (Karan Johar) 2019 मध्ये तख्त (Takht) या मोठ्या चित्रपटाची घोषणा केली होती.

मुंबई : चित्रपट निर्माता करण जोहरने (Karan Johar) 2019 मध्ये तख्त (Takht) या मोठ्या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटामध्ये बरेच प्रसिध्द अभिनेते आणि अभिनेत्री काम करताना दिसणार होते. रणवीर सिंग, करिना कपूर, आलिया भट्ट, भूमी पेडणेकर, विक्की कौशल, जाह्नवी कपूर आणि अनिल कपूर हे दिसणार होते. चाहते देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. मात्र, आता याच चित्रपटाबद्दल एक मोठी बातमी येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार करण जोहर हा मोठा चित्रपट करणार नाही त्याने या प्रोजेक्टचे काम थांबवले आहे. (Karan Johar’s ambitious project canceled)

यापूर्वी कोरोनामुळे या चित्रपटाचे काम थांबवण्यात आले होते. हा चित्रपट करण जोहरच्या सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक होता, ज्यासाठी तो जोरदार तयारी देखील करत होता. तख्तप्रमाणेच ‘कलंक’ हा चित्रपट करणचा एक मल्टीस्टारर प्रोजेक्ट होता जो 2019 मध्ये रिलीज झाला होता. मात्र, हा चित्रपट जबरदस्त फ्लॉप झाला होता. या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर, वरुण धवन, आलिया भट्ट सारखे कलाकार होते. तर दुसरीकडे करण जोहर दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळला आहे.

मध्यंतरी गौतम अदानी करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये 30 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहेत आणि तशी चर्चा देखील सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. करण जोहरची कंपनी धर्मा प्रोडक्शन ही सर्वात मोठी आणि सर्वाधिक चित्रपट बनवते. रणवीर-आलिया आणि अमिताभ बच्चन यांचा आगामी ब्रह्मास्त्र हा चित्रपट अद्याप पूर्ण झाला नाही आणि त्याचे बजेट 300 कोटींच्यावर गेले आहे.

याशिवाय जुग जुग जियो, शेरशाह, रणभूमि, दोस्ताना 2 ते सूर्यवंशी या मोठ्या बजेट चित्रपट चित्रपट यंदा हे रिलीज होऊ शकतात. भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपतींपैकी गौतम अदानी एक आहेत. त्यांनी यूपीमध्ये 35 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. जर करणचा आणि गौतम अदानी हा करार झाला आणि अदानी करण मिळून बॉलिवूडमधील चित्र बदलू शकेत.

संबंधित बातम्या : 

‘लूप लपेटा’ चित्रपटातील तापसी पन्नूचा हटके लूक बघितला का?

Pathan | पठाण चित्रपट बॉलिवूडची शान बनणार? शाहरुखने आखला मोठा प्लॅन!

पडद्यावर आदर्श बहु, वास्तवात संसाराचे तीन तेरा, एकदा मोडलं दुसऱ्यांदा बोहल्यावर, टीव्ही हिरोईन्सची कहाणी

(Karan Johar’s ambitious project canceled)

Published On - 4:33 pm, Tue, 2 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI