योगाची ताकद समजावणारी गर्भवती करिना ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर-खान (Kareena Kapoor-Khan) लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. करिना आठ महिन्यांची गर्भवती आहे.

योगाची ताकद समजावणारी गर्भवती करिना ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर-खान (Kareena Kapoor-Khan) लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. करिना आठ महिन्यांची गर्भवती आहे. गरोदरपणातील अनेक फोटो करिनाचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. करिनाने गर्भावस्थेत फिट राहण्यासाठी योगा करत असतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर धूमाकुळ घालत होते. मात्र, करिनाच्या या फोटोंना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. (Kareena Kapoor-Khan’s photo troll on social media)

काही लोकांचे म्हणणे आहे की, आपल्या देशात 63 टक्के महिला प्रसूती होईपर्यंत काम करतात. मग यांनी योगा केला तर यात काय मोठी गोष्ट आहे.

2016 मध्ये जेव्हा करिना पहिल्यांदा गर्भवती होती, तेव्हा तिने त्या कालावधीत काम करण्याचा खूप आनंद घेतला होता. दरम्यान, तिने अनेक जाहिरातींचे चित्रीकरण केले होते. बेबी बंपसह करिनाने रॅम्प वॉक केला होता. त्यावेळी तिचा हा रॅम्प वॉक अतिशय प्रसिद्ध झाला होता.

प्रेग्नेंसी होम टेस्ट किट बनविणारी आघाडीची कंपनी प्रेगा न्यूजने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली होती. पूर्वी त्याची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर करिना कपूर खान होती. यावेळी कंपनीने करिना ऐवजी अनुष्काची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवडले होते.

संबंधित बातम्या : 

चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता OTT वर एन्ट्री करण्यास ‘मास्टर’ सज्ज, अ‍ॅमेझॉन प्राइमवर होणार रिलीज!

अंकिताचं ठरलं! जुनं विसरुन नवा संसार थाटायचा, मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो व्हायरल?

(Kareena Kapoor-Khan’s photo troll on social media)

Published On - 1:24 pm, Wed, 27 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI