तैमुरसाठी सैफ-करीनामध्ये मोठी तडजोड; अभिनेत्रीकडून खुलासा

अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी मुलगा तैमुरसाठी खूप मोठी तडजोड केली आहे. याबद्दलचा खुलासा खुद्द करीनाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे. वर्षातील ठराविक महिने काम न करण्याचा निर्णय सैफने घेतला आहे. यामागे नेमकं कारण काय ते वाचा..

तैमुरसाठी सैफ-करीनामध्ये मोठी तडजोड; अभिनेत्रीकडून खुलासा
सैफ अली खान, करीना कपूर, तैमुर अली खानImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 10:30 AM

मुंबई : 26 जानेवारी 2024 | अभिनेत्री करीना कपूर आगामी ‘क्रू’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिच्यासोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री क्रिती सनॉन आणि तब्बू यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना करीनाने पती सैफ अली खानबद्दल एक खुलासा केला. वर्षातील ठराविक महिन्यात सैफ काम करत नाही आणि यामागचं नेमकं कारण काय याचा खुलाचा करीनाने केला.

जेव्हा सैफ त्याच्या कामात व्यग्र असतो, तेव्हा करीना तिच्या घरी आणि मुलांना वेळ देते. जेव्हा ती शूटिंगमध्ये व्यग्र असते, तेव्हा सैफ घरी राहतो आणि मुलांचा सांभाळ करतो. ही गोष्ट दोघांमध्ये खूप आधीपासून ठरलेली असल्याचं करीनाने स्पष्ट केलं. जून ते ऑगस्ट या महिन्यांत सैफ अजिबात काम करत नसल्याचं तिने सांगितलं. या महिन्यात मुलगा तैमुर अली खानच्या शाळेलाही सुट्टी असते. त्यामुळे त्याला व्हेकेशनवर नेण्यासाठी आणि दोन्ही मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी तो या ठराविक महिन्यांत काम करत नाही.

हे सुद्धा वाचा

2008 मध्ये ‘टशन’ या चित्रपटात काम करताना सैफ आणि करीना एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी 2012 मध्ये लग्न केलं. त्यानंतर 2016 मध्ये करीनाने तैमुरला जन्म दिला. फेब्रुवारी 2021 मध्ये करीना दुसऱ्यांदा आई बनली. जेह असं तिच्या छोट्या मुलाचं नाव आहे. सैफ आणि करीना यांच्या वयात दहा वर्षांचं अंतर आहे. सुरुवातीला वयातील अंतरावरून अनेकांनी दोघांवर टीका केली होती.

करीनाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, तिने नुकतंच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. ‘जाने जान’ या चित्रपटानंतर आता तिचा ‘क्रू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 29 मार्च रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे सैफ हा प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसला होता. तो लवकरच ‘देवारा: पार्ट 1’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ज्युनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांच्याही भूमिका आहेत.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....