मला हे माहीत होतं..; संजय कपूरच्या निधनाच्या 6 दिवसांनंतर तिसऱ्या पत्नीची पोस्ट व्हायरल
अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरच्या निधनाच्या सहा दिवसांनंतर त्याच्या तिसऱ्या पत्नीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिने ही पोस्ट लिहिली होती. करिश्माला घटस्फोट दिल्यानंतर संजयने प्रिया सचदेवशी तिसरं लग्न केलं होतं.

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरचं 12 जून रोजी वयाच्या 53 व्या वर्षी निधन झालं. लंडनमध्ये पोलो खेळत असताना संजयने चुकून मधमाशी गिळली आणि त्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं म्हटलं गेलंय. करिश्माला घटस्फोट दिल्यानंतर संजयने मॉडेल आणि अभिनेत्री प्रिया सचदेवशी लग्न केलं. प्रियाशी त्याचं हे तिसरं लग्न होतं. आता संजयच्या निधनानंतर प्रिया सचदेवची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रियाने ही खास पोस्ट लिहिली होती.
संजय आणि करिश्मा यांनी 2003 मध्ये धूमधडाक्यात लग्न केलं होतं. या दोघांना समायरा ही मुलगी आणि कियान हा मुलगा आहे. करिश्मा आणि संजय हे लग्नाच्या 11 वर्षांनंतर 2014 मध्ये विभक्त झाले. 2016 मध्ये त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. या घटस्फोटाच्या वर्षभरातच संजयने 2017 मध्ये प्रिया सचदेवशी तिसरं लग्न केलं. करिश्माशी संजयचं दुसरं लग्न होतं. तर प्रियापासून संजयला एक मुलगा आहे. प्रिया तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेकदा संजयसोबतचे फोटो पोस्ट करून प्रेम व्यक्त करताना दिसते. तिची शेवटची पोस्ट ही त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त होती.
View this post on Instagram
या पोस्टमध्ये प्रियाने लिहिलं होतं, ‘लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम. मला नेहमीच माहीत होतं की तू धावू शकतोस. परंतु एकत्र असल्यावर आपण उडू शकतो. तुझ्यासोबतचं आयुष्य अत्यंत आनंदाने, हास्याने, उत्साहाने, साहसाने आणि वेडेपणाने भरलेलं आहे. तुझ्यामुळे माझं अस्तित्व पूर्ण झालं आहे. माझ्या पाठिशी नेहमीच खंबीरपणे उभं राहिल्याबद्दल धन्यवाद.’ जरी संजयचं प्रियाशी तिसरं लग्न असलं तरी तिने त्याच्या पूर्व पत्नींच्या मुलांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. घटस्फोटानंतरही करिश्माच्या मुलांना भेटण्यासाठी संजय आवर्जून वेळ काढायचा. इतकंच नव्हे तर प्रियाने संजय आणि समायरा-कियान यांचे एकत्र वेळ घालवतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
संजयच्या निधनानंतर करिश्मासोबतचा त्याचा घटस्फोट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. करिश्मा आणि संजय विभक्त होऊन बरीच वर्षे झाली आहेत. त्यानंतर संजयने प्रिया सचदेवशी लग्न केलं. तर दुसरीकडे करिश्माने एकल मातृत्वाचा स्वीकार करत दोन्ही मुलांचं संगोपन केलं. घटस्फोटानंतर संजय त्याच्या मुलांच्या संगोपनासाठी करिश्माला दर महिन्याला मोठी रक्कम देत होाता. आता संजयच्या निधनानंतर करिश्माला ती रक्कम मिळणं बंद होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
