संजय कपूरच्या 30,000 कोटींच्या संपत्तीवर करिश्मा कपूरचा दावा, अभिनेत्री मुलांना घेऊन दिल्लीकडे रवाना, तिसरी पत्नीही मैदानात, थेट कंपनीच्या…
उद्योगपती संजय कपूर यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. आता त्यांच्या मोठ्या संपत्तीवरून वाद निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही मुलांना घेऊन दिल्लीत दाखल झालीये. ती देखील या संपत्तीसाठी आग्रही असल्याची माहिती मिळतंय.

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा एक्स पती आणि उद्योगपती संजय कपूर यांचे गेल्याच महिन्यात पोलो खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. संजय कपूर यांनी वयाच्या 53 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. संजय यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईने मोठा संशय व्यक्त केला. आता संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीवरून मोठा वाद निर्माण झालाय. संजय कपूर यांच्या 30 हजार कोटींची संपत्तीची मालकी नक्की कोणाकडे जाणार यावरून वाद सुरू असताना त्यांच्या तिन्ही पत्नी या मैदानात उतरल्याचे बघायला मिळतंय.
संजय कपूर यांची पत्नी प्रिया सचदेव हिने आता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या नावात मोठा बदल केला असून तिचे पूर्वीचे नाव प्रिया सचदेव कपूर असे होते आणि तिने आता प्रिया संजय कपूर असे केले आहे. संजय कपूरची पहिली पत्नी नंदिता महतानी हिने देखील या संपत्तीच्या वादात उडी घेतलीये. हेच नाही तर संजय कपूरची दुसरी पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही देखील संपत्तीच्या वादामध्ये आपल्या दोन्ही मुलांना घेऊन दिल्लीकडे रवाना झालीये.
संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेव हिने तिच्या सोशल मीडियावरील बायोमध्ये तर तिच्या कंपनीमधील तिच्या पदाचाही उल्लेख केला आहे नॉन एग्जक्यूटीव्ह डायरेक्टर, सोना कॉमस्टार…असे तिने स्पष्ट म्हटले आहे, यावरून आता मोठा वाद होण्याची दाट शक्यता आहे. तिन्ही पत्नी संजय कपूरच्या संपत्तीवर दावा करताना दिसत आहेत. यादरम्यानच संजय कपूरच्या आईने देखील मोठा आरोप केला होता.
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्मा कपूर हिने मोठा आग्रह धरल्याचे कळतंय. करिश्मा कपूरचे स्पष्ट म्हणणे आहे की, मला नाही पण माझ्या मुलांना संपत्तीमध्ये हक्क मिळाला पाहिजे. ज्यावेळी करिश्मा कपूर आण संजय कपूरचा घटस्फोट झाला, ज्यावेळीच मोठी रक्कम संजयने करिश्माला पोटगीही म्हणून दिली होती आणि ती कोट्यावधीच्या घरात होती.
सोना समूहाच्या माजी अध्यक्षा आणि माजी अध्यक्ष सुरेंद्र कपूर यांच्या पत्नी संजय कपूर यांची आई राणी कपूर यांनी सोना बीएलडब्ल्यू प्रेसिजन फोर्जिंग्सच्या संचालक मंडळाला पाठवलेल्या पत्रात आरोप केला आहे की, संजय कपूरच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंब दु:खात असताना काही लोक कंपनीवर नियंत्रण मिळवण्याचा आणि कंपनी हडपण्याचा प्रयत्न करत आहेत, यासोबतच त्यांनी अजूनही काही आरोपी केली होती.
