मुंबईत Adult वेब सीरीजचं शुटिंग जबरदस्तीने थांबवलं, करणी सेनेचा सेटवर धिंगाणा

करणी सेनेनं मुंबईत एका वेब सीरीजचं चित्रीकरण थांबवलं आहे. तसेच त्यांनी वेब सीरीजशी संबंधित लोकांविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मुंबईत Adult वेब सीरीजचं शुटिंग जबरदस्तीने थांबवलं, करणी सेनेचा सेटवर धिंगाणा
अक्षय चोरगे

|

Oct 11, 2020 | 11:40 AM

मुंबई : करणी सेनेनं मुंबईत एका वेब सीरीजचं चित्रीकरण थांबवलं आहे. तसेच त्यांनी वेब सीरीजशी संबंधित लोकांविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लेखी तक्रार करत त्यांनी संबंधित लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Karni Sena stops shooting web series in malad, File a complaint in Malvani police malad west)

मिळालेल्या माहितीनुसार काल (शनिवारी) संध्याकाळी मालाड पश्चिमेकडील मनिषा बंगलो परिसरात या वेब सीरीजचं चित्रीकरण सुरु होतं. त्याचदरम्यान करणी सेनेचे लोक तिथे दाखल झाले व त्यांनी जबरदस्तीने चित्रीकरण थांबवले. परंतु अद्याप वेब सीरीजशी संबंधित लोकांनी कोणतेही वक्तव्य केलेलं नाही. करणी सेनेने दावा केला आहे की, त्या ठिकाणी अॅडल्ट वेब सीरीजचं चित्रीकरण सुरु होतं.

वेब सीरीजची निर्मिती करणाऱ्या संस्थेविरोधात करणी सेनेने मालवणी पोलिसात याआधीच तक्रार दाखल केली आहे. त्यांनी लेखी तक्रारीत म्हटलं आहे की, संबंधित प्रोडक्शन हाऊस वेब सीरीजच्या नावाखाली केवळ अश्लील चित्रपट बनवतात. करणी सेनेच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून प्रोडक्शन हाऊसच्या लोकांची चौकशी सुरु आहे.

गेल्या काही वर्षांपासून करणी सेना सिने क्षेत्रातील प्रत्येक बाबींवर लक्ष ठेवून असल्याचे जाणवते. करणी सेनेने यापूर्वी संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ या चित्रपटाच्या सेटवर तोडफोड केली होती, तसेच सेट जाळण्याची धमकीदेखील दिली होती.

करणी सेना प्रामुख्याने ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांबाबत आक्रमक भूमिका घेत असते. यावेळी त्यांनी वेब सीरीजला लक्ष्य केलं आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले होते. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करुन चित्रपट बनवत असल्याचा आरोप करत त्यांनी पृथ्वीराजच्या सेटवर धिंगाणा घातला होता.

संबंधित बातम्या

Laxmmi Bomb Trailer | ‘बॉयकॉट’चा धसका, ‘लक्ष्मी बॉम्ब’ ट्रेलरमध्ये लाईक-डिसलाईक बटण गायब!

‘हे माफिया माझी हत्या करुन आत्महत्या असं दाखवतील’, पायल घोषची पीएम मोदींना हाक

Jasleen Matharu | जसलीन मथारू-अनुप जलोटा वधू-वर वेशात, सोशल मीडियावरील फोटोंवर चाहत्यांकडून प्रश्नांची सरबत्ती!

(Karni Sena stops shooting web series in malad, File a complaint in Malvani police malad west)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें