Caught | जाहिरातीच्या शूटिंगसाठी रणबीर-कतरिना एकत्र, दोघांना सोबत बघून चाहत्यांना अत्यानंद!

बॉलिवूडमधील प्रेम प्रकरण, ब्रेकअप, विवाद हे नेहमीच सुरू असतात. पण जेंव्हा ब्रेकअप झाल्यानंतर दोन मोठे स्टार एकमेकांसमोर तेव्हा काय होते पहा.

Caught | जाहिरातीच्या शूटिंगसाठी रणबीर-कतरिना एकत्र, दोघांना सोबत बघून चाहत्यांना अत्यानंद!

मुंबई : बॉलिवूडमधील प्रेम प्रकरण, ब्रेकअप, विवाद हे नेहमीच सुरू असतात. पण जेंव्हा ब्रेकअप झाल्यानंतर दोन मोठे स्टार एकमेकांसमोर येतात, तेव्हा काय होते पहा. कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी नुकताच एका जाहिरातीमध्ये सोबत काम केले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे आणि या व्हिडिओची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. मात्र, कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या चाहत्यांना या दोघांनासोबत पाहून अतिशय आनंद झालेला दिसत आहेत. कतरिना आणि रणबीर यांच्या ब्रेकअपला जवळपास दोन वर्षपूर्ण होत आहेत. (Katrina Kaif and Ranbir Kapoor together for an ad shoot)

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांनी एका मोबाईल कंपनीची जाहिरात नुकताच शूट केली आहे. या शूटवेळी त्यांनी बरीच धमाल देखील केलेली व्हिडिओत दिसत आहे. टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर लवकरच ही जाहिरात दिसणार आहे. रणबीर कपूर आणि कतरिना कैफचे 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी या दोघांनी अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम  केले आहे. लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्न आहेत. कधीही याअगोदर दोघेही त्यांच्या नात्याबद्दल बोलले नव्हते. मात्र, रणबीरने या नात्याबद्दल दुजोरा दिला आहे.

रणबीरने नुकतीच राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत आपली गर्लफ्रेंड आलियाबद्दल सांगितले आणि ऐवढेच नाहीतर लग्न कधी करणार आहे याबद्दल देखील रणबीरने सांगितले होते. रणबीरने मुलाखतीत सांगितले की, दोघांनी लॉकडाऊनमध्ये एकत्र वेळ घालवला. दिवसभर रणबीर चित्रपट आणि मालिका बघायचा, तर आलिया काहीतरी नवीन शिकत होती.

तो म्हणाला की, सुरुवातीला आम्ही कौटुंबिक त्रासातून जात होतो. त्यानंतर, मी पुस्तके वाचण्यास आणि कुटुंबासमवेत वेळ घालवू लागलो आणि दिवसातून 2-3 चित्रपट बघायचो. आलियासोबतच्या लग्नाबाबत रणबीर म्हणतो की, हा कोरोना व्हायरल आला नसता तर कदाचित आम्ही आतापर्यंत लग्न देखील केले असते.

संबंधित बातम्या :

Trailer Out | विदेशात परिणीती चोप्रा काय शोधतीय?, पाहा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’चा शानदार टिझर!

रंगबेरंगी कपड्यानंतर रणवीर सिंहचा हटके मास्क, नवा लूक पाहून चाहत्यांच्या गंमतीशीर कमेंट्स

(Katrina Kaif and Ranbir Kapoor together for an ad shoot)

Published On - 4:05 pm, Wed, 13 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI