विकी-कतरिनाच्या मुलाची पावर, जन्माला येताच इतक्या कोटींचा वारस
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी 7 नोव्हेंबर रोजी मुलाचं जगात स्वागत केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्याने चाहत्यांसोबत आनंद शेअर केला. तर जन्माला येताच कतरिनाचा लेक कोटींचा वारस झाला आहे.

Katrina Kaif and Vicky Kaushal : बॉलिवूडचं लोकप्रिय कपल अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांना चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आहे. विकी आणि कतरिना यांनी मुलगा झाल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जन्माला येताय, विकी आणि कतरिना यांचा लेक कोट्यवधींचा मालक झाला आहे. विकी-कॅट हे बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस आणि यशस्वी कपलपैकी एक आहेत आणि त्यांची संपत्ती कोट्यवधींची आहे.
एकूण मालमत्ता 265 कोटींपेक्षा जास्त
विकी आणि कतरिनाची ग्लॅमरस जीवनशैली त्यांच्या संपत्तीतून स्पष्टपणे दिसून येते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी कौशलची एकूण संपत्ती अंदाजे 41 कोटी रुपये आहे. तर कतरिना हिची संपत्ती 224 कोटी रुपये आहे. म्हणजे विकी आणि कतरिनायांनी मालमत्ता जवळपास 265 कोटी रुपये आहे. म्हणजे विकी आणि कतरिना यांचा मुलगा जन्मतः 265 कोटींचा मालक झाला आहे.
विकी कौशल याची कमाई आणि करीयर
विकीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं नाव कमावलं आहे. बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्यांमध्ये विकी याचं प्रथम स्थानी आहे. छावा, बॅड न्यूज आणि सॅम बहादूर, यांसारख्या सिनेमांसाठी अभिनेत्याने प्रत्येकी 10 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. दिवसागणिक विकी याच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ होत आहे.
कतरिना कैफ म्हणजे बॉक्स ऑफिस क्वीन आणि बिजनेसवुमन
कतरिनाने सिनेमा आणि ब्रँड नावांद्वारे कोट्यवधी रुपये कमावले आहेत. मेरी क्रिसमस आणि टायगर ३ सारख्या सिनेमांसाठी तिने 15 – 21 कोटी रुपयांपर्यंत मानधन घेतलं होतं. याशिवाय, कतरिनाने 2021 मध्ये ब्युटी ब्रँड, के ब्युटी लाँच केला ज्यामुळे कतरिना हिच्या कमाईत मोठी वाढ झाली. सांगायचं झालं तर, 2025 पर्यंतर कतरिना हिच्या कमाईचा आकडा 240 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
प्रॉपर्टी आणि कार कलेक्शन
कतरिना हिच्याकडे मुंबईत अनेक प्रॉपर्टी आहे. ज्यामध्ये वांद्रे येथील 3 BHK अपार्टमेंट, लोखंडवाला येथील प्रीमियम प्रॉपर्टी आणि लंडन येथील बंगला… तर विकी याच्याकडे चांगली संपत्ती आहे.
विकी आणि कतरिना यांच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या कार देखील आहेत. ज्यामध्ये दोन रेंज रोव्हर, मर्सिडीज-बेंज GLE, ऑडी Q7 आणि BMW 5GT आहेत. विकी आणि कतरिना त्यांच्या कुटुंबासोबत आलिशान आयुष्य जगत आहेत.
