
Katrina Kaif Pregnant News: अभिनेत्री परिणिती चोप्रा हिच्यानंतर अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल याने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली. लग्नाच्या चार वर्षांनंतर विकी आणि कतरिना यांच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. काही दिवसांपूर्वी विकी आणि कतरिना यांनी एक फोटो पोस्ट करत प्रेग्नेसीची घोषणा केली. दोघांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आणि चाहत्यांना दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. वयाच्या 42 व्या वर्षी कतरिना पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.
कौशल आणि कैफ कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण असताना विकी कौशल याचा भाऊ आणि अभिनेता सनी कौशल याने घरात सध्या कसं वातावरण आहे… याबद्दल सांगितलं आहे. शनिवारी रात्री सनी कौशल मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी झाला. कार्यक्रमादरम्यान सनीने खुलासा केला की कतरिना कैफला बाळ होणार आहे आणि विकी वडील होणार आहे.
लवकरच काका होणार आहेस, कसं वाटत आहे? असा प्रश्न सनी कौशल याला विचारण्यात आला. यावर सनी म्हणाला, ‘कुटुंबातील प्रत्येक जण आनंदी आहे पण भीती देखील वाटत आहे… प्रत्येक जण विचार करत आहे की, पुढे कसं आणि काय होणार.. आता फक्त त्याची प्रतिक्षा आहे…’ असं सनी कौशल म्हणाला.
सांगायचं झालं तर, गेल्या अनेक महिन्यांपासून कतरिना हिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांनी जोर धरला होता. पण यावर कतरिना आणि विकी यांनी कायम मौन बाळगलं… अखेर काही दिवसांपूर्वी कतरिना आणि विकी यांनी प्रेग्नेंसीची घोषणा केली आणि चाहत्यांचा आनंद शिगेला पोहोचला… फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये अभिनेत्री म्हणाली, ‘आपण आनंद आणि प्रेमाने आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करणार आहोत.’ पोस्टनंतर कतरिना आणि विकी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ तिच्या गरोदरपणाच्या तिसऱ्या ट्राइमेस्टर आहे. असा दावा केला जात आहे की ती 15 ते 30 ऑक्टोबर बाळाल जन्म देऊ शकते… पण याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.