AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कतरिना कैफ प्रेग्नंट? विकी कौशलसोबत बोटीवरचा व्हिडिओ व्हायरल, ओवरसाइज्ड शर्टमध्ये बेबी बंप लपवताना दिसली

कतरिनाच्या प्रेग्नंसीबद्दल पुन्हा एकदा जोरदार चर्चा होताना दिसत आहे. विकी आणि कतरिनाच्या एका व्हिडिओमुळे पुन्हा एकदा कतरिनाच्या प्रेग्नंसीबद्दल जोरदार चर्चा होताना दिसत आहे. कतरिना ओवरसाइज्ड पांढऱ्या शर्टमध्ये बेबी बंप झाकताना दिसत आहे.

कतरिना कैफ प्रेग्नंट? विकी कौशलसोबत बोटीवरचा व्हिडिओ व्हायरल, ओवरसाइज्ड शर्टमध्ये बेबी बंप लपवताना दिसली
Katrina Kaif Pregnant? Viral Video Sparks Baby Bump SpeculationImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 02, 2025 | 1:30 PM
Share

बॉलिवूडमधील सर्वांचच आवडतं कपल म्हणजे विकी कौशल आणि कतरिना कैफ. ही जोडी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि अर्थातच लोकप्रियही. त्यामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची प्रत्येक चाहत्याला उत्सुकता असते. यावेळी देखील दोघेही पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. या व्हिडीओमध्ये कतरिनाचं बेबी बंप दिसत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. तसेच त्यांचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे जास्तच चर्चा होताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कतरिना ओवरसाइज्ड शर्टमध्ये दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा कतरिनाच्या प्रेग्नंसीबद्दल जोरदार चर्चा

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विकी आणि कतरिना एकत्र दिसत आहेत आणि या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा कतरिनाच्या प्रेग्नंसीबद्दल जोरदार चर्चा होताना दिसत आहे. लोक या व्हिडिओवर सतत कमेंट करत आहेत. व्हिडिओमध्ये दोघेही मुंबईहून अलिबागला जाताना दिसत आहेत. कतरिनाने ओवरसाइज्ड पांढरा शर्ट आणि पँट घातली आहे, तर विकी कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. दोघांचेही चेहरे मास्कने झाकले आहे.

कतरिना तिचा बेबी बंप लपवत आहे का?

हा व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांच्या नजरा थेट कतरिनाच्या मोठ्या ओवरसाइज्ड शर्टवर गेल्या. लोक तिच्या चालण्याच्या स्टाईलवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत. अनेक सोशल मीडिया युजर्सचं असं म्हणणं आहे की ती अशापद्धतीने चालत आहे आणि ओवरसाइज्ड शर्टने जणू ती तिचं बेबी बंप लपवत आहे.

View this post on Instagram

A post shared by HT City (@htcity)

व्हिडीओ पाहून चाहत्यांकडून या कपलसाठी प्रार्थना

एका युजरने व्हिडीओवर कमेंट केली आहे, “कॅट प्रेग्नंट दिसतेय…” दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘मी प्रार्थना करतो की आपल्याला लवकरच चांगली बातमी मिळेल, तिचे कपडे आणि चालण्याची पद्धत थोडी वेगळी वाटते.” तर एका युजरने असेही लिहिले आहे की, ‘जर ती प्रेग्नंट असेल तर नक्कीच सर्वांना खूप आनंद होईल” तर अजून एकाने म्हटलं आहे की “देवा, कृपया तिला जुळ्या मुलांचा आशीर्वाद द्या.” तर अशापद्धतीने चाहते देखील हा व्हिडीओ पाहून फार उत्सुक आहेत तसेच विकी-कतरिनासाठी प्रार्थना देखील करत आहेत.

रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ जुना असल्याचं म्हणणं

पण काही रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ जुना देखील असू शकतो. असे म्हटले जात आहे की हा व्हिडिओ मार्चमध्ये झालेल्या लग्नाच्या रिसेप्शननंतर अलिबाग ट्रिपचा आहे. मार्चमध्येही जेव्हा कतरिना एका लग्नाला उपस्थित होती तेव्हा तिने विकी कौशलच्या नावाचा टॅटू खांद्यावर काढून लोकांची मने जिंकली होती. आता पुन्हा एकदा या व्हिडीओमुळे चाहत्यांच्या मनात त्यांच्या या फेव्हरेट कपलबाबत एक आनंदाची आशा निर्माण झाली आहे.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.