KBC 17: विज्ञानाशीसंबंधीत या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती आहे का? गोल्ड मेडलिस्टने देखील मानली हार
KBC 17: कौन बनेगा करोडपतीचा सध्या 17वा सिझन सुरु आहे. या शोमध्ये सहभागी झालेली गोल्ड मेडलिस्ट शीतलने 25 लाख रुपयांच्या प्रश्नाला खेळ सोडला. आता या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येईल का? वाचा प्रश्न काय होता.

छोट्या पडद्यावरील क्विज शो म्हणून कौन बनेगा करोडपती पाहिला जातो. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या कित्येक वर्षांपासून या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या बुद्धीमान लोकांना या शोने कोट्यावधी रुपये जिंकण्याची संधी दिली आहे. सध्या या शोचा 17वा सिझन सुरु आहे. 9 डिसेंबरला पार पडलेल्या एपिसोडमध्ये कृषी विज्ञान क्षेत्रातील गोल्ड मेडलिस्ट शीत सहभागी झाली होती. तिने 25 लाख रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे खेळ सोडला. आता या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता काय़
शितलने बुद्धीमत्तेच्या जोरावर सुरुवातीच्या आठ प्रश्नांची योग्य उत्तर दिले. त्यामुळे सुपर संदूर राऊंडमध्ये तिला ऑडियंस पोल ही लाइफलाइन पुन्हा जिवंत करण्यात आली. अमिताभ बच्चन यांनी शीतल यांना ७.५० लाख रुपयांचा ११वा प्रश्न विचारला. प्रश्न होता- ‘कोणत्या शासकाचं नाव एका पीरच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं, ज्या पीरच्या आर्कोट येथील कब्रवर फातिमा फख्र-उन-निसा या एका मुलाच्या जन्मासाठी प्रार्थना करण्यासाठी गेल्या होत्या?’ पर्याय होते-
A. बहादुर शाह जफर
B. इब्राहीम आदिल शाह
C. मीर उस्मान अली खान
D. टीपू सुलतान
कंटेस्टंटने लाइफलाइन ऑडियन्स पोलचा वापर केला आणि पर्याय D. टीपू सुलतान निवडला, जो योग्य होता. त्यानंतर १२.५० लाख रुपयांच्या १२व्या प्रश्नावर त्या अडकल्या. तरीही त्यांनी उरलेल्या दोन्ही लाइफलाइन ५०-५० आणि संकेत सूचकचा वापर करून धोका पत्करला आणि खेळ पुढे नेला.
बिग बींनी विचारलेला प्रश्न होता, ‘टेस्ट शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर कोण होती, जी टेस्ट संघाची पहिली कर्णधारही होती?’ पर्याय होते-
A. डायना एडुल्जी
B. शांता रंगस्वामी
C. नीतू डेविड
D. शुभांगी कुलकर्णी
कंटेस्टंटने धोका पत्करत पर्याय B. शांता रंगस्वामी निवडला, जो योग्य होता. त्यानंतर बिग बींनी २५ लाख रुपयांचा १३वा प्रश्न विचारला, ‘१६८७ मध्ये आयझॅक न्यूटन यांनी ‘नॅचरल फिलॉसॉफीचे गणितीय तत्वज्ञान’ (Philosophiæ Naturalis Principia Mathematica) हे त्यांचे पुस्तक कोणत्या भाषेत प्रकाशित केले?’ पर्याय होते-
A. ग्रीक (यूनानी)
B. फ्रेंच
C. लॅटिन
D. इंग्लिश
स्पर्धक शीतल यांनी या प्रश्नावर गेम क्विट केला. त्यांना योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांनी मोठी रिस्क घेतली नाही. त्यांनी १२.५० लाख रुपये जिंकून घरी परतल्या. या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला माहिती आहे का? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय C लॅटिन.
