AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan : सॉरी सर .. केबीसीच्या सेटवर आयुष्मानने चक्क बिग बींची मागितली माफी

'कौन बनेगा करोडपति' च्या 18 व्या सिझनमध्ये आयुष्मान खुराणा आणि सारा अली खान उपस्थित होते. आयुष्मानने अमिताभ बच्चन यांना 'बुढ़ऊ' म्हटल्याबद्दल मजेशीर माफी मागितली, आणि त्यांची स्तुती केली. 'गुलाबो सिताबो' चित्रपटातील सीन त्यांनी पुन्हा साकारला.

Amitabh Bachchan : सॉरी सर .. केबीसीच्या सेटवर आयुष्मानने चक्क बिग बींची मागितली माफी
| Updated on: Oct 06, 2026 | 8:28 PM
Share

KBC 18 : ‘कौन बनेगा करोडपति’ या क्विझ रिॲलिटी शोचा सध्या 18 वा सीझन सुरू आहे. नुकताच अभिनेता आयुष्मान खुराना आणि सारा अली खाने, हे दोघे केबीसीमध्ये आले होते. यावेळी आयुष्यमान आणि केबीसीचे होस्ट, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) , या दोघांनी ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटातील एक सीन एनॅक्ट केला. मात्र त्यामध्ये आयु्ष्मान हा अमिताभ यांना ‘बुढ़ऊ’ म्हणजे म्हातारा असं म्हणतो. 2019 साली आलेल्या या चित्रपटात अमताभ -आयुष्मान यांनी एकत्र काम केलं होतं. यानंतर आयुष्मानने अमिताभ यांना सॉरी म्हटलं, ‘बुढ़ऊ’ म्हटल्याबद्दल त्याने मजेशीर अंदाजात त्यांची माफी मागितली. त्याचा हा मजेशीर अंदाज चर्चेत आहे.

‘बुढ़ऊ’ म्हटल्याबद्दल आयुष्मानने मागितली माफी

आयुष्मान खुराना आणि अमिताभ बच्चन यांनी 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या चित्रपटात आयुष्मानने अमिताभ यांच्या व्यक्तिरेखेला ‘बुढ़ऊ’ म्हणून संबोधले होते. केबीसीच्या मंचावर या चित्रपटाचा उल्लेख झाल्यानंतर आयुष्मान अमिताभ बच्चन यांच्याकडे वळला आणि मजेशीर अंदाजात म्हणाला, “आपल्याला चित्रपटात ‘बुढ़ऊ’ म्हटलं, त्याबद्दल मला माफ करा सर. आपण बुढ़ऊ नाही. खरं सांगतो. आपण आपलं वय 84 वर्षं असल्याचं सांगता, पण आपण तर 28 वर्षांचे दिसता.” आयुष्मानचे हे बोलणे ऐकून अमिताभ बच्चन यांनाही हसू आवरता आले नाही. त्यांनीही विनोदी अंदाजात आयुष्मानला विचारले की, “84 व्या वर्षाच्या हरकती म्हणजे काय?” यानंतर दोघांमध्ये चांगलीच हास्याची मैफल रंगली.

साराला वाटतो आयुष्मानचा हेवा

केबीसीच्या या एपिसोडमध्ये सारा अली खाननेही अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. आयुष्मानने अमिताभ यांच्यासोबत आधीच चित्रपटात काम केले आहे, याचा तिला थोडा हेवाही वाटतो, असं तिने मजेशीरपणे सांगितले. साराने सांगितले की, तिच्या कुटुंबातील अनेक कलाकारांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं आहे. तिची आई अमृता सिंग, आजी शर्मिला टागोर आणि कुटुंबातील इतर अनेक कलाकारांचा बिग बींसोबत काम करण्याचा अनुभव आहे. मात्र, तिला अद्याप अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळालेली नाही.

साराचे हे बोलणे ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी तिच्या कुटुंबाचे कौतुक केलं. त्यांनी पटौदी कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यांचे विशेष कौतुक करत, त्यांचे डोळे अतिशय सुंदर असल्याचे सांगितलं.

अमिताभ बच्चन यांनी सांगितली जुनी आठवण

साराच्या कुटुंबाचा उल्लेख सुरू असताना अमिताभ बच्चन यांनी तिचे आजोबा आणि माजी क्रिकेटपटू मन्सूर अली खान पटौडी यांच्या कुटुंबाशी संबंधित एक जुनी आठवणही सांगितली. त्यांनी दिल्लीत ओपन जॅग्वारमधून फिरण्याची आठवण शेअर केली. या जुन्या आठवणींमुळे केबीसीच्या मंचावर एक वेगळाच भावनिक आणि मजेशीर माहोल निर्माण झाला.

आयुष्मानने सादर केले अमिताभ यांचे प्रसिद्ध संवाद

या एपिसोडमध्ये आयुष्मान खुरानाने ‘केबीसी रेडिओ’ या खास सेगमेंटमध्येही सहभाग घेतला. हा भाग खास अमिताभ बच्चन यांना समर्पित करण्यात आला होता. या सेगमेंटमध्ये आयुष्मानने अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या चित्रपटांमधील प्रसिद्ध संवाद त्यांच्या खास शैलीत सादर केले.त्याचं सादरीकरण पाहून अमिताभ बच्चनही आनंदी झाले ‘गुलाबो सिताबो’मधील ‘बुढ़ऊ’ या संवादापासून ते अमिताभ यांच्या लोकप्रिय संवादांच्या सादरीकरणापर्यंत, आयुष्मान आणि बिग बी यांच्यातील ही मजेशीर केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली.

Follow Us
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?
आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; कौलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
Shivsena : आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; शिंदे गटाचे वकील नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता