AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KBC : टाईल्स फिट करणाऱ्याने जिंकले 50 लाख, 1 कोटीचा तो प्रश्न देशात चर्चेचा विषय; 99 टक्के लोकांना उत्तर माहितीच नाही!

KBC 1 Crore Question : टाइल्स फिटिंगचे काम करणारे कृष्ण कुमावत हे KBC च्या हॉटसीटवर पोहोचले आणि त्यांनी तब्बल 50 लाख रुपये जिंकले. त्याला विचारण्यात आलेला 1 कोटींचा प्रश्न काय होता ते जाणून घेऊयात.

KBC : टाईल्स फिट करणाऱ्याने जिंकले 50 लाख, 1 कोटीचा तो प्रश्न देशात चर्चेचा विषय; 99 टक्के लोकांना उत्तर माहितीच नाही!
KBC 1 Crore Question
| Updated on: Sep 02, 2026 | 7:00 PM
Share

कौन बनेगा करोडपतीमध्ये पुन्हा एकदा एका सामान्य व्यक्तीने आपल्या ज्ञानाच्या जोरावर मोठी रक्कम जिंकली आहे. टाइल्स फिटिंगचे काम करणारे कृष्ण कुमावत हे KBC च्या हॉटसीटवर पोहोचले आणि त्यांनी तब्बल 50 लाख रुपये जिंकले. कृष्ण यांना रोजची सुमारे 800 रुपये मजुरी मिळते. KBC मधून मिळालेल्या या पैशांचा वापर ते आपल्या घराची दुरुस्ती करण्यासाठी तसेच मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी करणार आहेत. मात्र, कृष्ण हे 1 कोटी रुपये जिंकण्यापासून थोडक्यात दूर राहिले. अमिताभ बच्चन यांनी त्यांना 1 कोटी रुपयांसाठी पायथागोरस प्रमेयाशी संबंधित प्रश्न विचारला होता. हा प्रश्न काय होता याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कुटुंबासाठी सोडले शिक्षण

राजस्थानमधील शामपुरा येथून आलेल्या कृष्ण कुमावत यांनी KBC मध्ये बोलताना सांगितले की, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी बारावीनंतर शिक्षण सोडले होती. बारावीनंतर त्यांनी कुटुंबाला आर्थिक आधार देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. शिक्षण अर्धवट राहिले असले तरी शिकण्याची त्यांची इच्छा कधीच कमी झाली नाही. त्यांच्या मेहनतीमुळे अखेर त्यांना कौन बनेगा करोडपती 18 च्या हॉटसीटवर बसण्याची संधी मिळाली. येथे त्यांनी तब्बल 50 लाख रुपये जिंकले आणि 1 कोटी रुपयांच्या प्रश्नावर खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.

पहिल्यांदाच केला विमानाने प्रवास

कृष्ण गेल्या 10 ते 15 वर्षांपासून टाइल्स बसवण्याचे काम करत आहेत. ते घरातील फरशी, स्वयंपाकघर आणि बाथरूममध्ये टाइल्स लावण्याचे काम करतात. भावंडांमध्ये सर्वात मोठे असल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन लहान वयातच त्यांच्यावर जबाबदाऱ्या आल्या. KBC मधील आपल्या प्रवासाबद्दल बोलताना कृष्ण यांनी सांगितले की, ते पहिल्यांदाच मुंबईत आले होते. इतकेच नाही तर आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी विमानाने प्रवास केला. KBC मधून मिळालेल्या पैशांतून आपल्या पत्नीसाठी मंगळसूत्र बनवण्याचीही त्यांची इच्छा आहे.

काय होता 1 कोटी रुपयांचा प्रश्न?

अत्यंत संयमाने खेळत कृष्ण हळूहळू 1 कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचले. त्यानंतर शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी त्यांना विचारले, “खालीलपैकी कोणत्या भावी अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने खासदार म्हणून काम करत असताना पायथागोरस प्रमेयाचा मूळ पुरावा प्रकाशित केला होता?” म्हणजे पायथागोरस प्रमेयाचा मूळ पुरावा प्रकाशित करणारा कोणता खासदार भविष्यात राष्ट्राध्यक्ष बनला. या प्रश्नासाठी झॅकरी टेलर, जेम्स बुकानन, रदरफोर्ड बी. हेज, जेम्स ए. गारफिल्ड हे चार पर्याय देण्यात आले होते. कृष्ण यांना या प्रश्नाच्या उत्तराबाबत खात्री नव्हती. त्यामुळे धोका पत्करण्याऐवजी त्यांनी 50 लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नाचे योग्य उत्तर जेम्स ए. गारफिल्ड हे होते.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा