AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई भाड्याने हवी?.. केदार शिंदेंच्या नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा, लेकीचीच निर्मिती

एकीकडे धमाल, हसवणूक आणि मनोरंजन, तर दुसरीकडे अंतर्मुख करणारा आशय या दुहेरी ताकदीमुळे ‘आई भाड्याने हवी?’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरणार, यात शंका नाही. आता या ‘आई’च्या शोधाची कथा नेमकी कशी उलगडते, हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

आई भाड्याने हवी?.. केदार शिंदेंच्या नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा, लेकीचीच निर्मिती
Kedar Shinde and Sana ShindeImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 20, 2026 | 3:32 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळी ओळख देणारे दिग्दर्शक केदार शिंदे आता आणखी एका वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या संकल्पनेसह प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘अगंबाई…अरेच्चा!’, ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता ‘आई भाड्याने हवी?’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सनफ्लॉवर स्टुडिओ निर्मित या चित्रपटाची कथा आणि लेखन वैशाली शशी नाईक आणि ओंकार वसुंधरा दत्त यांनी केलं आहे. विशेष म्हणजे ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’नंतर निर्माती सना शिंदे, दिग्दर्शक केदार शिंदे, लेखिका वैशाली शशी नाईक, लेखक ओंकार वसुंधरा दत्त ही चौकडी पुन्हा एकदा एकत्र येत असल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

या चित्रपटाविषयी दिग्दर्शक केदार शिंदे सांगतात, “स्त्रीप्रधान विषय हाताळणं ही नेहमीच जबाबदारीची आणि आव्हानात्मक गोष्ट असते. जोपर्यंत एखादी कथा मनापासून भिडत नाही, तोपर्यंत अशा चित्रपटाची सुरुवात करायची नाही, असा माझा ठाम निर्धार होता. ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ आणि ‘आई भाड्याने हवी?’ या दोन्ही चित्रपटांचे काम 2023 पासून सुरू झालं. ‘आई भाड्याने हवी?’ हा चित्रपट मी ज्यांना आदर्श मानतो त्या राजकुमार हिरानी यांच्या शैलीची झलक देणारा आहे. हा केवळ विनोदी चित्रपट नाही, तर ‘आई’ या नात्याचा गाभा मांडणारा, मनाला स्पर्श करून जाणारा अनुभव आहे. मनोरंजनासोबतच विचार करायला लावणं हे माझं ध्येय असतं आणि या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवेल. शीर्षकातूनच आजच्या काळातील भावनिक तगमग जाणवते. सध्या कलाकारांची निवड सुरू असून, विविध वयोगटातील ‘आई’ प्रेक्षकांना पाहायला मिळतील. जून-जुलैमध्ये चित्रीकरणाला सुरुवात होईल.”

निर्माती सना शिंदे म्हणाली, “पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे या नव्या चित्रपटाबद्दलही तितकीच उत्सुकता आहे. पहिला चित्रपट भावनिक अंगाने साकारण्यात आला होता, तर ‘आई भाड्याने हवी?’ हा पूर्णपणे मनोरंजनप्रधान, रंगतदार आणि मल्टीस्टारर आहे. यात नातेसंबंध, भावना आणि विनोद यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळेल. मला वैयक्तिकरित्या स्त्रीकेंद्री कथा आवडतात, त्यात ‘आई’ ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सक्षम आणि प्रभावी व्यक्तिरेखा असते. प्रेक्षकांना आशयघन आणि मनाला भिडणारे चित्रपट देण्याचा आमचा प्रयत्न कायम असतो, आणि हा चित्रपट त्याच दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.”

‘आई भाड्याने हवी?’ या वेगळ्या शीर्षकातूनच प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण होत आहे. आजच्या बदलत्या कुटुंबव्यवस्थेत ‘आई’ या नात्याची गरज, त्याची उणीव आणि त्यामागची भावनिक पोकळी यावर हा चित्रपट हलक्याफुलक्या तरीही परिणामकारक पद्धतीने भाष्य करणार असल्याचं दिसतं.

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट