केदार शिंदेंचे पुन्हा ‘शुभमंगल’, बांदेकरांकडून कन्यादान, शर्मन जोशी म्हणतो दुसरीबार डेअरींग कैसे?

केदार शिंदे आणि बेला यांचा विवाह 1996 मध्ये झाला. नुकतंच त्यांच्या लग्नाची सिल्व्हर ज्युबिली झाली (Kedar Shinde Wedding anniversary Sharman Joshi )

केदार शिंदेंचे पुन्हा 'शुभमंगल', बांदेकरांकडून कन्यादान, शर्मन जोशी म्हणतो दुसरीबार डेअरींग कैसे?
Kedar Shinde Wedding anniversary

मुंबई : प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी पुन्हा शुभमंगल केले. चक्रावून जाऊ नका, लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदे यांनी पुन्हा विवाह सोहळा आयोजित केला होता. पत्नी बेलासोबत (Bela Shinde) बांधलेली लग्नगाठ या निमित्ताने त्यांनी घट्ट केली. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी ऑनलाईन उपस्थिती लावली होती. (Kedar Shinde Bela Shinde Marries Again on 25th Wedding anniversary Sharman Joshi Adesh Bandekar attends online)

लग्नाला कोणाकोणाची हजेरी?

केदार शिंदेंचे बालमित्र आणि अभिनेते अंकुश चौधरी, भरत जाधव यांच्यासह सिद्धार्थ जाधव, आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर, शर्मन जोशी यासारखे सेलिब्रिटी आणि जवळचे नातेवाईक, मित्र मंडळींनी हजेरी लावली होती. रविवार 9 मे रोजी घरातच हा विवाहसोहळा पार पडला. केदार यांच्या मावशी वसुंधरा साबळे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली.

आदेश भाऊजींकडून कन्यादान

बेला घरातून पळून आल्यामुळे त्यांच्या कन्यादानाला मुकलेले त्यांचे कुटुंबीय यावेळीही लॉकडाऊनमुळे मुकलेच. ती जबाबदारी मात्र आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी मोठ्या आनंदाने पार पाडली. तर भरत जाधव, अंकुश चौधरी यांना नाईलाजाने घरी बसून सोहळ्यात सहभागी व्हावं लागलं.

शर्मन जोशीची गमतीदार कमेंट

बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशी सहकुटुंब सोहळा पाहात होता. तो म्हणाला “यार केदार हम एक बार शादी करके पछताते हैं, तुमने दुसरी बार ये डेअरिंग कैसे किया?” असं म्हणताच लग्नाच्या गंभीरा वातावरणात एकच हशा पिकला. तर अभिनेता सिद्धार्थ जाधवने मित्राच्या लग्नानिमित्त घरच्या घरी डान्स करुन आनंद लुटला.

लग्नाचा पंचविसावा वाढदिवस

केदार शिंदे आणि बेला यांचा विवाह 1996 मध्ये झाला. त्यांना सना ही मुलगी आहे. नुकतंच त्यांच्या लग्नाची सिल्व्हर ज्युबिली झाली. या निमित्ताने ऑनलाईन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. (Kedar Shinde Wedding anniversary Sharman Joshi )

केदार शिंदेंच्या गाजलेल्या कलाकृती

हसा चटकफू, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय, सुखी माणसाचा सदरा यासारख्या मालिका केदार शिंदे यांनी दिल्या आहेत. तर अगंबाई अरेच्चा, जत्रा, यंदा कर्तव्य आहे, गलगले निघाले यासारख्या सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. सही रे सही, लोच्या झाला रे ही केदार शिंदे दिग्दर्शित नाटकंही गाजली आहेत.

पाहा केदार आणि बेला शिंदे यांच्या लग्नाचे फोटो

काल सकाळी आपापल्या घरी आम्ही केदारचे सर्व नातेवाईक आणि त्याची मीत्रमंडळी रवीवार असुनही ११ वाजताचा मुहूर्त चुकू नये…

Posted by Vasundhara Sable on Sunday, 9 May 2021

 

संबंधित बातम्या :

‘आता बास झालं, मुंबई पोलीस आमची शान, आमचा गर्व’, मराठी दिग्दर्शक खवळला

(Kedar Shinde Bela Shinde Marries Again on 25th Wedding anniversary Sharman Joshi Adesh Bandekar attends online)