AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KGF मधील अभिनेत्याचे निधन, शेवटचा Video पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

सध्या सोशल मीडियावर KGF चित्रपटातील अभिनेत्याचा शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल...

KGF मधील अभिनेत्याचे निधन, शेवटचा Video पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
KGF actorImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 09, 2025 | 1:06 PM
Share

दाक्षिणात्य चित्रपटांमधील हिट ठरलेल्या चित्रपटांच्या यादीमध्ये KGFचे नाव घेतले. या चित्रपटात कासिम चाचााची भूमिका साकारणारे अभिनेते हरीश राय यांचे ६ नोव्हेंबर रोजी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे चाहते आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. एकदा त्यांनी चाहते आणि इंडस्ट्रीतील लोकांकडून उपचारासाठी आर्थिक मदतीची विनंती केली होती. आता हरीश राय यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयातील त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते भावुक झाले आहेत आणि अभिनेत्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

हरीश राय यांचा शेवटचा व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर २६ ऑक्टोबर रोजी शेअर करण्यात आला होता. त्यासोबत लिहिले होते, ‘तुमच्या प्रार्थना आणि आशीर्वादाची गरज आहे.’ ही त्यांची शेवटची पोस्ट आहे, जी पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल. व्हिडीओमध्ये हरीश राय रुग्णालयाच्या बेडवर झोपलेले आहेत. नाक आणि पोटात नळी लावलेली आहे आणि डॉक्टर त्यांच्या पोटाला इंजेक्शन देताना दिसत आहेत. यामुळे हरीश यांना तुफान वेदना होताना दिसत आहेत. त्यांच्या पोटावर अनेक ठिकाणी जखमा दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Harish Roy (@actorharishroy)

हरीश राय यांची अवस्था पाहून चाहते भावुक

हा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आले आहे. एकाने या व्हिडीओवर कमेंट केली, ‘हे पाहून खूप दुखः होते. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.’ एकाने लिहिले, ‘KGF किंग आम्ही तुम्हाला खूप मिस करू.’ एकाने म्हटले, ‘सर तुम्हाला खूप आठवण येईल. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.’

KGFच्या शूटिंगदरम्यानही होता कर्करोग, दाढीने लपवली होती सूज

हरीश राय यांना घशाचा कर्करोग झाला होता, जो आता पोटापर्यंत पसरला होता. KGF च्या शूटिंगच्या वेळी ते कर्करोगाशी झुंज देत होते आणि त्यांच्या घशावर खूप सूज होती. त्यामुळेच तेव्हा हरीश राय यांनी चित्रपटातील कासिम चाचााच्या भूमिकेसाठी दाढी वाढवली होती. हे त्यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते.

अनेक वर्षांपासून कर्करोगाशी झुंज, उपचारासाठी ७० लाखांची गरज होती

कर्करोगामुळेच हरीश राय यांनी चित्रपटांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी २०२२ मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते की ते तीन वर्षांपासून कर्करोगाशी लढा देत आहेत. त्यांच्या उपचाराचा खर्च खूप मोठा होता. एक-एक इंजेक्शन ३.५५ लाख रुपयांचे लागत होते. हरीश राय यांनी सांगितले होते की त्यांच्या उपचारासाठी किमान ७० लाख रुपयांची गरज आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीतील लोक आणि मित्रांकडून आर्थिक मदत मागितली होती.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.