KGF Chapter 2: जे भल्याभल्यांना जमलं नाही ते ‘रॉकी भाई’ने करून दाखवलं, कमाईच्या आकड्याने डोळे विस्फारतील!

आजपर्यंत कुठल्याही कन्नड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली नव्हती. पण केजीएफ 2 ने कमाईचे सर्व विक्रमच मोडले आहेत. यशची (Yash) मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला.

KGF Chapter 2: जे भल्याभल्यांना जमलं नाही ते 'रॉकी भाई'ने करून दाखवलं, कमाईच्या आकड्याने डोळे विस्फारतील!
KGF 2Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 2:19 PM

प्रशांत नील दिग्दर्शित ‘केजीएफ: चाप्टर 2’ (KGF Chapter 2) हा चित्रपट कन्नड चित्रपटसृष्टीत सुवर्णकाळ घेऊन आला. आजपर्यंत कुठल्याही कन्नड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली नव्हती. पण केजीएफ 2 ने कमाईचे सर्व विक्रमच मोडले आहेत. यशची (Yash) मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. गेल्या महिन्याभरात या चित्रपटाने जगभरात तब्बल 1200 कोटींचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे या 1200 पैकी 1000 कोटींची कमाई ही फक्त भारतातूनच झाली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन महिना उलटला तरी, यादरम्यान इतरही महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित झाले तरी केजीएफ 2 ची कमाई अजूनही सुरूच आहे. 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा हा भारतातील दुसरा चित्रपट ठरला आहे. याआधी एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली 2’ने (Bahubali 2) हा विक्रम रचला होता. विशेष म्हणजे, हे दोन्ही दाक्षिणात्य चित्रपट आहेत. केवळ एकच भाषेत चित्रपट प्रदर्शित न करता विविध भाषांमध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा फायदा या दोन्ही चित्रपटांना मोठ्या प्रमाणात झाला.

चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी कमाईविषयीची माहिती दिली. ‘केजीएफ 2 ने भारतातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी रुपये कमावले आहेत. बाहुबली 2 नंतर इतकं यश मिळवणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे’, असं ट्विट त्यांनी केलंय. कन्नड सुपरस्टार यशची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट थिएटरनंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आला आहे. अॅमेझॉन प्राईमवर ‘पे पर व्ह्यू’च्या आधारे हा चित्रपट पाहता येतोय. ओटीटी प्लॅटफॉर्मने तब्बल 320 कोटी रुपयांना केजीएफ 2चे हक्क विकत घेतल्याचं कळतंय. ओटीटीवरही यशचा हा चित्रपट व्ह्यूजचा विक्रम मोडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांचं ट्विट-

यशसोबतच यामध्ये संजय दत्त, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज आणि रवीना टंडन या कलाकारांच्याही भूमिका आहेत. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ: चाप्टर 1’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. जगभरातील तब्बल 10 हजारांहून अधिक स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील हे सर्वांत मोठं रिलिज होतं. कन्नडसोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेतही तो प्रदर्शित करण्यात आला.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.