AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KGF 2 च्या वितरकांना लॉटरी; मिळाला 5 पटींनी जास्त नफा

'केजीएफ 2'चे डिस्ट्रीब्युटर्स झाले मालामाल; यश ठरला खरा 'ब्रह्मास्त्र'

KGF 2 च्या वितरकांना लॉटरी; मिळाला 5 पटींनी जास्त नफा
KGF 2 च्या वितरकांना लॉटरी; मिळाला 5 पटींनी जास्त नफाImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 19, 2022 | 5:01 PM
Share

भारतीय चित्रपटसृष्टीत ‘केजीएफ 2’ (KGF 2) या चित्रपटाने आपला विक्रम नोंदविला आहे. यशची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळालं. बॉक्स ऑफिस कलेक्शनचे नवे विक्रम या चित्रपटाने रचले. आता या चित्रपटाच्या वितरकांनी किती नफा कमावला, त्याचा आकडा समोर आला आहे. हा आकडा चित्रपटाच्या बजेटच्या पाच पटींनी अधिक आहे. त्यामुळे वितरकांनी पाच पटींनी अधिक नफा (distributors’ profit) कमावला, असं म्हणायला हरकत नाही.

केजीएफ- चाप्टर 1 हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. केजीएफ- चाप्टर 2 हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा त्याने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली. केजीएफ 2 ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल 116 कोटींचा गल्ला जमवला होता.

केजीएफ 2 ने जगभरात जवळपास 1200 कोटींहून अधिक कमाई केली. आता ‘सिनेट्रॅक’ने दिलेल्या वृत्तानुसार, हा चित्रपट वितरकांसाठी मोठी लॉटरी ठरला आहे. कारण वितरकांनी यातून तब्बल 535 कोटींचा नफा कमावला आहे. खरेदीची किंमत वजा केल्यानंतर जगभरातील वितरकांनी केलेला हा नफा आहे.

चित्रपटाच्या कमाईचं गणित समजून घेतलं तर निर्माता हा चित्रपटाचा मालक असतो. तोच चित्रपट बनवतो आणि त्यात पैसे गुंतवतो. चित्रपट बनवल्यानंतर त्याचा नफा चित्रपटाच्या बजेटमध्ये जोडून तो वितरकांना विकावा लागतो. पुढे वितरकच चित्रपटाला सिनेमागृहात घेऊन जातात. तिथूनच आपण चित्रपटाची तिकीट खरेदी करतो.

केजीएफ- चाप्टर 2 चा बजेट हा 100 कोटींचा असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे वितरकांचा हा नफा पाच पटींनी अधिक आहे. आता केजीएफचा तिसरा भागसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2024 पर्यंत हा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. केजीएफ 2 मध्ये कन्नड सुपरस्टार यशसोबतच रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, संजय दत्त यांच्याही भूमिका आहेत.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.