AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ए चल, हवा येऊ दे..; निलेश साबळेबद्दल किरण मानेची पोस्ट चर्चेत

किरण माने हा सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत मांडताना दिसतो. आता त्याने निलेश साबळेला पाठिंबा दिला आहे.

ए चल, हवा येऊ दे..; निलेश साबळेबद्दल किरण मानेची पोस्ट चर्चेत
Kiran mane and Nilesh SableImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 04, 2025 | 1:00 PM
Share

‘चला हवा येऊ द्या’ हा छोट्या पडद्यावरील शो पुन्हा एकदा नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक महिन्यांच्या ब्रेकनंतर हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. पण या वेळी शोचे सूत्रसंचालन निलेश साबळे करणार नसून अभिनेता अभिजीत खांडकेकर करणार आहे. ते पाहून राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी निलेश साबळेवर पोस्ट लिहित टीका केली होती. आता अभिनेता किरण माने या पोस्ट शेअर करत निलेश साबळेला पाठिंबा दिला आहे.

काय आहे किरण मानेची पोस्ट?

किरण मानेने त्याच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर ही पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने निलेश साबळेला पाठिंबा दिला आहे. ‘निलेश साबळे, मी तुला तुझ्या अगदी सुरुवातीच्या स्ट्रगलच्या काळापासून ओळखतोय. तू कसा आहेस याचं स्पष्टीकरण द्यायची तुला काहीही गरज नाहीये. तू जे मिळवलं आहेस त्यामागे अफाट कष्ट आहेत. प्रामाणिकपणा आहे. कामावरची निष्ठा आहे. इतरांकडे नसलेलं ज्ञान आपल्याकडे आहे’,असं भासवून ज्यांनी आयुष्यभर लोकांना भुलवण्याचे उद्योग केले त्यांनी केलेली टीका आपण किती आणि का मनाला लावून घ्यायची???’ असे तो म्हणाला.

वाचा: मयूरी देशमुखने रोमँटिक सीन शूट करताना अभिनेत्याच्या लगावली कानशि‍लात, नेमकं काय झालं?

पुढे तो म्हणाला की, ‘तुकोबाराया सांगून गेले आहेत, सांगो जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ।। त्यांचा आम्हांसी कंटाळा । पाहो नावडती डोळां ।। कुणाच्या वल्गनांना किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायला हवं. तू तुझ्या करीयरमधल्या वेगळ्या टप्प्यावर आहेस. तू आता सुत्रसंचालक हा शिक्का पुसून ‘अभिनेता’ म्हणून स्वत:ची ओळख करून देण्यासाठी सज्ज होतो आहेस. तुला मनापासून शुभेच्छा. जीव लावून काम कर. यश तुझेच आहे. टीकाकारांना उंच कोलून टाक… आणि म्हण, ए चल्… हवा येऊ दे.’

काय आहे प्रकरण?

राशीचक्रकार शरद उपाध्ये हे काही वर्षांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये गेले होते. पण तेव्हाचा त्यांचा अनुभव अतिशय वाईट होता. त्यांनी आता फेसबुक अकाऊंटवर पोस्ट शेअर करत निलेश साबळेला खडसावले होते. त्यांची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. ती पोस्ट पाहून किरण मानेने निलेश साबळेला पाठिंबा दिला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?