काउंसलिंगमुळे सुटतात आयुष्यातील अडचणी? आमिर खानसोबत घटस्फोट, किरणचा मोठा खुलासा
'घटस्फोट झालेल्या पुरुषासोबत राहणं म्हणजे...', आमिर खान याच्याबद्दल किरण रावचा मोठा खुलासा, काउंसलिंगबद्दल देखील केलं मोठं वक्तव्य... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किरण राव - आमिर खान यांच्या नात्याचीच चर्चा... नुकताच झालेल्या एका मुलाखतीत किरणचा खुलासा...

मुंबई | 13 मार्च 2024 : अभिनेता आमिर खान याची दुसरी पत्नी आणि दिग्दर्शिका किरण राव गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता देखील किरण हिने आमिर याच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किरण राव हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. किरण म्हणली, ‘असा व्यक्ती ज्याचा घटस्फोट झाला आहे किंवा तुमच्या आधी त्याच्या आयुष्यात कोणी इतर व्यक्ती असेल. त्यावर मनावर भावनात्मक ओझं असतं… हेच भावनात्मक ओझं तुमच्या नात्यासाठी घातक ठरतं…’
काउंसलिंगबद्दल देखील किरण हिने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘आमचं नातं टिकवण्यासाठी आम्ही काउंसलिंगची देखील मदत घेतली. ज्यामुळे तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी समोर ठेऊ शकता. काउंसलिंगमुळेच मी आणि आमिर एक गोष्टीवर सहमत झालो होतो आणि ती गोष्ट म्हणजे एकमेकांप्रती प्रामाणिक राहायचं… मग काहीही झालं तरी चालेल…’
किरण राव हिच्यामुळे झाला आमिर खान याचा पहिला घटस्फोट?
रीना दत्ता हिच्यासोबत आमिर खान याचं पहिलं लग्न झालं. आमिर आणि रीना यांना एक मुलगा आणि एक मुगली आहे. किरण हिच्यामुळे आमिर आणि रीना यांचा घटस्फोट झाल्याची चर्चा रंगली होती. यावर किरण म्हणाली, ‘जेव्हा 2004 मध्ये मी आणि आमिरने बाहेर येणं-जाणं सुरु केलं तेव्हा अनेकांना वाटलं आमचं अफेअर ‘लगान’ सिनेमापासून सुरु आहे आणि माझ्यामुळे आमिरचा घटस्फोट झाला. पण हे सत्य नाही…’ असं देखील किरण राव म्हणाली…
‘लापता लेडिज’ सिनेमा
‘लापता लेडिज’ सिनेमाची कथा आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. फक्त प्रेक्षक नाहीतर, सेलिब्रिटी देखील सिनेमाचं कौतुक करत आहेत. सिनेमात अभिनेता रवी किशन याच्यासोबत नीतांशी गोयल, प्रतिभा रंता, छाया कदम, नीतांशी गोयल यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त 5 लाख रुपयांच्या बजेटमध्ये सिनेमा तयार करण्यात आा आहे. प्रदर्शनानंतर सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 12 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाची सर्वत्र चर्चा रंगत आहे. त्यामुळे सिनेमा किती कोटीपर्यंत मजल मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
