सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चा टीझर लीक; व्हिडीओत दिसली शहनाज गिलची झलक

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Jan 25, 2023 | 11:07 AM

सलमान आणि शाहरुखची मैत्री जगजाहीर आहे. बॉलिवूडचा बादशाह आणि भाईजान यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहणं ही चाहत्यांची पर्वणीच असते. अशातच 'पठाण'सोबत सलमानने त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.

सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान'चा टीझर लीक; व्हिडीओत दिसली शहनाज गिलची झलक
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan चा टीझर प्रदर्शित
Image Credit source: Instagram

मुंबई: अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खानच्या चाहत्यांसाठी आज (25 जानेवारी) दुप्पट आनंदाचा दिवस आहे. कारण एकीकडे शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर दुसरीकडे सलमानच्या ‘किसी का भाई किसी का जान’ या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 24 जानेवारी रोजी सलमानने चित्रपटाचा पोस्टर शेअर करत टीझरबद्दलची माहिती दिली होती. अखेर प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली आहे.

सलमान आणि शाहरुखची मैत्री जगजाहीर आहे. बॉलिवूडचा बादशाह आणि भाईजान यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहणं ही चाहत्यांची पर्वणीच असते. अशातच ‘पठाण’सोबत सलमानने त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. या टीझरमध्ये सलमान पुन्हा एकदा दबंग अंदाजात पहायला मिळतोय.

‘किसी का भाई किसी का जान’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये सलमानचा ॲक्शन अवतार पहायला मिळतोय. याचसोबत त्याचे अभिनेत्री पूजा हेगडेसोबत काही रोमँटिक सीन्स आहेत. या व्हिडीओमध्ये ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री शहनाज गिलने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.

शहनाजला साऊथ इंडियन लूकमध्ये पाहून चाहते खुश झाले आहेत. सलमानच्या चित्रपटातून तिचं बॉलिवूडमध्ये काम करण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे. शहनाजसोबतच या टीझरमध्ये जस्सी गिल, राघव जुयाल आणि पलक तिवारी हे कलाकारसुद्धा पहायला मिळत आहेत.

किसी का भाई किसी की जान या चित्रपटात सलमान दोन वेगवेगळ्या लूकमध्ये पहायला मिळणार आहे. हा चित्रपट त्याच्या इतर चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे. या मल्टीस्टारर चित्रपटात सलमानने बऱ्याच तरुण कलाकारांना संधी दिली आहे. टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

पलक तिवारी आणि शहनाज गिल यांच्याशिवाय चित्रपटात जस्सी गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम आणि बॉक्स विजेंद्र सिंह हेसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. किसी का भाई किसी की जान हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI