AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहा हजारांच्या नोटांवर झोपवून बारसं, पत्नीसाठी जोडवेही सोन्याचे; आनंद शिंदेंचे हे किस्से माहीत आहेत काय?

लोकगीतं, आंबेडकरी गीतं आणि चित्रपट गीतांमुळे मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे गायक आनंद शिंदे यांनाही गायक म्हणून नावारुपाला येण्यासाठी अनेक संघर्ष करावा लागला आहे. (know about Marathi playback singer anand shinde)

दहा हजारांच्या नोटांवर झोपवून बारसं, पत्नीसाठी जोडवेही सोन्याचे; आनंद शिंदेंचे हे किस्से माहीत आहेत काय?
आनंद शिंदे, पार्श्वगायक
| Updated on: Mar 03, 2021 | 6:50 PM
Share

मुंबई: लोकगीतं, आंबेडकरी गीतं आणि चित्रपट गीतांमुळे मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे गायक आनंद शिंदे यांनाही गायक म्हणून नावारुपाला येण्यासाठी अनेक संघर्ष करावा लागला आहे. वडील प्रल्हाद शिंदे स्वरसम्राट म्हणून महाराष्ट्रात लोकप्रिय असतानाही गायक म्हणून सिद्ध होण्यासाठी आनंद शिंदे यांना कठोर मेहनत घ्यावी लागली. घरची गरीबी, कमी शिक्षण या सर्वांवर मात करत केवळ जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर आनंद यांनी यश संपादन केलंय. त्यांच्या या यशोगाथेतील संघर्षाचा घेतलेला हा आढावा… (know about Marathi playback singer anand shinde)

दहा हजाराच्या नोटा आणि बारसं

आनंद शिंदे यांचा जन्म 21 एप्रिल 1961 रोजी झाला. त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील प्रल्हाद शिंदे कार्यक्रमानिमित्त नागपूरला गेले होते. प्रल्हाद शिंदे मुंबईत आल्यानंतर आनंद यांचं बारसं करण्यात आलं. ‘बारशाच्या वेळी मला वडिलांनी दहा हजाराच्या नोटांवर झोपवलं होतं. इतक्या जोशात आणि दणक्यात माझं बारसं करण्यात आलं होतं’, असं आनंद शिंदे सांगतात. सुरुवातीचा संघर्षाचा काळ सोडला तर आयुष्यात कधीच पैशाची चणचण भासली नाही, असंही ते अधोरेखित करतात.

स्थलांतरामुळे शिक्षणाचा खोळंबा

शिंदे कुटुंबीयांनी स्थिरस्थावर होण्यासाठी सातत्याने स्थलांतर केलं. सुरुवातीला कामाठीपुऱ्यात राहणारे शिंदे कुटुंबीय नंतर कल्याणच्या कोळसेवाडीत स्थिरावलं. पण सातत्याने होणाऱ्या स्थलांतरामुळे आनंद शिंदे यांना मुंबईतच तीन ते चार वेळा शाळा बदलाव्या लागल्या. आयुष्याचा काही काळ आजोळी गेल्यानेही आनंद यांच्या शिक्षणात खंड पडला होता. त्यामुळे त्यांचं शिक्षण जेमतेम इयत्ता नववीपर्यंत झालेलं आहे. शिक्षण होऊ न शकल्याची खंत ते आजही बोलून दाखवत असतात. मात्र असं असलं तरी त्यांनी मुलांच्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही. त्यांचा मोठा मुलगा हर्षद कॉम्प्युटर इंजीनियर आहे. तर उत्कर्ष हे डॉक्टर आहेत. आदर्श शिंदे गायक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहेच.

सहा महिन्यात तबला शिकले

आनंद शिंदे यांचा तबला शिकण्याचा किस्साही तसाच अफलातून आहे. शाळा सोडल्यानंतर त्यांनी तबला शिकण्यास सुरुवात केली. वडिलांच्या देखरेखीत ते तबला शिकत होते. घरातील संगीत मैफलीच्या कार्यक्रमामुळे गळ्यात गाणं होतंच. ऱ्हिदमची जाण होतीच. त्याचा त्यांना तबला शिकताना फायदा झाला. अवघ्या सहा महिन्यातच ते तबला वाजवायला शिकले. त्यासाठी अक्षरश: रात्र न् दिवस कष्ट घेतले, सराव केला. प्रसंगी वडिलांचा मारही खाल्ला. आनंद तबला वादन शिकत असताना मिलिंद शिंदे मात्र हार्मोनियम वाजवायला शिकत होते. वडिलांच्या माराच्या धाकाने मिलिंद तबला वाजवत नसे. पण वडील घराबाहेर गेले की मिलिंद तबल्यावरून सराईतपणे हात फिरवायचा. खरं सांगायचं म्हणजे मी मार खाऊन तबला वाजवायला शिकलो. तर मिलिंद बघून बघूनच शिकला. मिलिंद बघून बघून तबला वाजवायला शिकला. त्यामुळे तो डाव्या हाताने तबला वाजवतो तर मी उजव्या हाताने तबला वाजवतो, असं आनंद सांगतात.

वडिलांच्या गैरहजेरीत लग्न

आनंद यांचं लग्न वयाच्या 18 व्या वर्षी झालं. कल्याणच्या कोळशेवाडीतच त्यांचं लग्न झालं. गायक म्हणून नावारुपाला येण्याआधीच त्यांच्या संसाराचा गाडा सुरू झाला होता. गाण्यांच्या कार्यक्रमामुळे प्रल्हाद शिंदे यांना आनंद यांच्या लग्नाला उपस्थित राहता आलं नव्हतं. वडिलांच्या गैरहजेरीतच आनंद यांच्या लग्नाचा बार उडवून देण्यात आला होता. वडील मोठे गायक असले तरी त्या काळी मानधन कमी मिळायचं. अपुऱ्या बिदागीमध्ये घर खर्च चालत नसे. त्यामुळे सुरुवातीला शिंदे कुटुंबीयांची आर्थिक स्थिती बेताचीच होती. त्यामुळे आनंद यांना पत्नीच्या गळ्यात सोन्याचं मंगळसूत्रंही घालता आलं नाही. पत्नीच्या गळ्यात नकली मंगळसूत्रं घालण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. पण त्यांच्या पत्नीनेही कधी त्याची कुरकुर केली नाही. पत्नीला सोन्याचं मंगळसूत्रं देऊ शकलो नाही, याची मला अजूनही सल आहे. त्यामुळेच नंतर आर्थिक स्थिती चांगली झाल्यावर मी पत्नीला जोडवेही सोन्याचे केले होते, असं ते सांगतात. (साभार, ‘आंबेडकरी कलावंत’) (know about Marathi playback singer anand shinde)

संबंधित बातम्या:

‘पोपटा’चं गाणं सर्वात आधी कुणी गायलं?; आनंद शिंदेंकडे ते कसं आलं?; वाचा आनंद शिंदेंना स्टार बनविणाऱ्या गाण्याचा किस्सा!

ठाकरे कुटुंबीयांसोबत जमीन खरेदीत भागिदारी?; कोण आहेत रवींद्र वायकर वाचा सविस्तर!

प्रवीण दरेकरांमुळे पुन्हा चर्चेत आलेलं मुंबै बँक घोटाळा प्रकरण काय आहे?, काय आहेत दरेकरांवर आरोप; वाचा स्पेशल रिपोर्ट

डोक्यात पंप हाणू म्हणणाऱ्या आमदार राम सातपुतेंवर स्पेशल रिपोर्ट; वाचा सविस्तर!

(know about Marathi playback singer anand shinde)

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.