नर्गिस फाखरीच नव्हे ‘हे’ बॉलिवूड कलाकारही कुटुंबावरील आरोपामुळे अडकलेले वादात
बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीची धाकटी बहीण आलियाला तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि त्याच्या मैत्रिणीच्या हत्येप्रकरणी अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. दरम्यान, इतरही स्टार्स त्यांच्या नातेवाईकांवरील आरोपांमुळे एकेकाळी चर्चेत आल्या होत्या, याविषयी जाणून घ्या.

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी सध्या चर्चेत आहे. मात्र ही चर्चा तिच्या आगामी कोणत्याही सिनेमाची नसून नर्गिसचं नाव चर्चेत आहे कारण तिची बहिण आहे, नर्गिस फाखरीची धाकटी बहीण आलिया हिच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नर्गिस फाखरीची धाकटी बहीण आलियावर अमेरिकेत तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि त्याच्या मैत्रिणीला जाळून मारल्याचा आरोप आहे. गेल्या महिन्याच्या 26 तारखेला अमेरिकन पोलिसांनी आलियाला अटक केली. तिच्याविरोधात न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
बॉलिवूडमधील अभिनेत्री किंवा अभिनेत्यांच्या कुटुंबातील सदस्यावर गंभीर आरोप होण्याची किंवा तुरुंगात जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा अनेक स्टार्स आहेत जे आपल्या नातेवाईकामुळे चर्चेत आले आहेत. चला जाणून घेऊया त्या बॉलिवूड तारे-तारकांबद्दल.
मिथुन चक्रवर्ती – महाक्षय
हिंदीसह तेलगू, बंगाली, ओडिया, भोजपुरी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या मिथुन चक्रवर्ती यांनाही मुलामुळे अडचणीचा सामना करावा लागला. मिथुन दा यांचा मुलगा महाअक्षयवर बलात्काराचा आरोप होता. महाअक्षयने हॉन्टेड-3D या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, ज्याला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. रिपोर्टनुसार, या आरोपामुळे महाअक्षयचे लग्न रद्द करावे लागले.
सुनील दत्त-संजय दत्त
दिग्गज अभिनेते सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्तबद्दल कोणाला माहिती नाही? 12 मार्च 1993 रोजी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावेही समोर आली होती, त्यापैकी एक म्हणजे संजय दत्त. अबू सालेम आणि रियाज सिद्दीकी यांच्याकडून बेकायदा बंदुका घेऊन त्या बाळगणे आणि नंतर त्यांची विल्हेवाट लावणे या प्रकरणात संजय दत्त दोषी आढळला होता, ज्यासाठी त्याला तुरुंगात जावे लागले होते.
शाहरुख खान-आर्यन
2021 मध्ये क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आर्यन हा बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा असल्याने हे प्रकरण अधिकच हायप्रोफाईल झालं. मात्र, या प्रकरणाचा तपास केल्यानंतर आर्यनला क्लीन चिट मिळाली.
फिरोज खान-फरदीन
प्रसिद्ध अभिनेते फिरोज खान यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीला अनेक उत्तम चित्रपट दिले. 2001 मध्ये मुलगा फरदीन खानमुळे फिरोज यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. फरदीनवर कोकेन घेतल्याचा आरोप होता, तसेच अभिनेत्याला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. इतकंच नाही तर फरदीनला पुनर्वसन केंद्रातही ठेवण्यात आलं आहे.
