AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येकाला आपली शाळा आठवणार..; ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा कडक टीझर पाहिलात का?

येत्या नवीन वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून ही मराठी शाळा चित्रपटगृहात भरणार आहे. क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित, ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाचे सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्मस्) आणि अजिंक्य ढमाळ हे आहेत. या सर्वांनी मिळूनच 'झिम्मा' आणि 'झिम्मा 2' या चित्रपटांची निर्मिती केली होती.

प्रत्येकाला आपली शाळा आठवणार..; ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’चा कडक टीझर पाहिलात का?
‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 23, 2025 | 1:57 PM
Share

मराठी शाळांची घटती संख्या, खालावलेली पटसंख्या आणि मातृभाषेतील शिक्षणाची कमी होत जाणारी आवड… या सगळ्या पार्श्वभूमीवर अलीकडेच हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. मराठी शाळांच्या अस्तित्वाच्या लढ्याला अधोरेखित करणाऱ्या या चित्रपटाचा प्रचंड मनोरंजक असा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हेमंत ढोमे यांचे विषय हे नेहमीच तुमच्या आमच्या घरातले असतात आणि म्हणूनच ते प्रेक्षकांना अधिक जवळचे वाटतात. त्यामुळे आता या चित्रपटात पुन्हा एकदा प्रत्येकाच्या आयुष्यात आलेली शाळा आणि मग त्या काळातल्या सगळ्या आठवणी पाहायला मिळणार हे नक्की. हा चित्रपट प्रेक्षागृहात आपलं मनोरंजन करणार यावर या टीझरने शिक्कामोर्तब केल्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

टीझरमध्ये दिसतेय की, मराठी शाळा बंद होण्याच्या संकटात सापडली असताना, जुने विद्यार्थी अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र येऊन शाळेला भेट देतात. या भेटीनंतर सुरू होते ती, त्यांच्या शाळेतील आठवणींची, नात्यांची आणि शाळेप्रती असलेल्या प्रेमाची नवी सफर. दिग्दर्शक हेमंत ढोमे यावेळेस प्रेक्षकांना आपल्या शालेय जीवनाची सफर घडवणार आहे. यात मराठी कलाकारांची दमदार फौज झळकणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर या चित्रपटात मुख्यध्यापकाच्या भूमिकेत दिसणार असून अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर या कलाकारांसोबतच मराठी चित्रपटात पहिल्यांदाच प्राजक्ता कोळी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “ शाळा हा आपल्या आयुष्याचा पाया असतो. आपण घडतो ते शाळेतच. पहिली भिती, पहिला राग, पहिली मेत्री, पहिलं प्रेम हे सारंकाही आपण शाळेतच अनुभवतो. त्यामुळेच मराठी शाळेचं हे भावविश्व रंगवताना प्रेक्षकांना त्यांच्या शाळेतल्या आठवणी अनुभवायला मिळतील याची पुरेपूर काळजी घेतली आहे प्रेक्षकांचं मनोरंजन करत मराठी शाळांचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न मी केला आहे मला खात्री आहे प्रेक्षकांना आपली शाळा आठवणार आणि मराठी शाळा पुन्हा भरणार.”

या टीझरवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘खूप खूप प्रेम’ असं अभिनेत्री सायली संजीवने लिहिलंय. तर ‘या प्रवासासाठी मी फार उत्सुक आहे’, असं वैदेही परशुरामीने म्हटलंय. जितेंद्र जोशी यांनी ‘कडक’ अशा शब्दांत कौतुक केलंय.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.