7 वर्ष राष्ट्रीय पुरस्काराची वाट पहिली, कुमार सानूने व्यक्त केले दुःख..

| Updated on: Feb 03, 2021 | 4:55 PM

चुरा के दिल मेरा, मैं दुनिया भुला दूंगा या सारखे अनेक हिट गाणे गाऊन रसिकांच्या हृदयावर राज्य करणारे गायक कुमार सानू (Kumar Sanu) यांना कोण ओळखत नाही.

7 वर्ष राष्ट्रीय पुरस्काराची वाट पहिली, कुमार सानूने व्यक्त केले दुःख..
Follow us on

मुंबई : चुरा के दिल मेरा, मैं दुनिया भुला दूंगा या सारखे अनेक हिट गाणे गाऊन रसिकांच्या हृदयावर राज्य करणारे गायक कुमार सानू (Kumar Sanu) यांना कोण ओळखत नाही. विशेष म्हणजे आतापर्यंत कुमार सानू यांनी 14000 हून अधिक गाणे गायली आहेत. कुमार सानू यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. मात्र, कुमार सानू यांनी नुकतीच राष्ट्रीय पुरस्काराबद्दल त्यांच्या मनातील खदखद बोलू दाखवली आहे. कुमार सानू यांना अद्याप एकही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही याचे त्यांना अत्यंत दु: ख आहे. एनबीटीच्या वृत्तानुसार, कुमार सानू म्हणतात की, मला अद्याप एकही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही. (Kumar Sanu expressed his sadness that he did not get the national award)

कारण त्यांना वाटत असेल की, मी राष्ट्रीय पुरस्कारास पात्र नाही, म्हणून मला अद्याप तसे पुरस्कार देण्यात आले नाहीत .कुमार सानू म्हणले की मला वाटते की, 1990, 91, 92, 93, 94, 95 आणि 1996 मध्ये सलग 7 वर्ष मला राष्ट्रीय पुरस्कार मिळायला पाहिजे होते. कारण या सर्व वर्षांत माझी सर्व गाणी हिट झाली होती, आता तर मी या राष्ट्रीय पुरस्कारांची अपेक्षाही सोडली आहे, जेंव्हा भेटायला पाहिजे होते तेव्हा भेटले नाहीत तर आता काय भेटणार आहेत.

‘बिग बॉस 14’च्या घरातून जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu) बाहेर पडला होता. त्यावेळी जानने घराबाहेर आल्यावर वडील कुमार सानू यांच्या वक्तव्यावर भाष्य करत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांना आपल्या संस्कारांविषयी बोलण्याचा काहीच हक्क नसल्याचे जानने म्हटले होते. त्यानंतर कुमार सानू यांनीदेखील जानच्या या वक्तव्यामुळे आपल्याला वाईट वाटल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी जानला स्वतःचे नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.

संबंधित बातम्या : 

शाहरुख-सलमान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, भाईजानची पठाण चित्रपटात एन्ट्री!

Accident | शूटिंग सुरू होताच ‘आदिपुरुष’ च्या सेटवर दुर्घटना!

आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट ओटीटीवर झळकणार!

(Kumar Sanu expressed his sadness that he did not get the national award)