AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनस्क्रीन भावालाच डेट करतेय ‘क्योंकी 2’मधील अभिनेत्री; स्वत:च केला खुलासा

'क्योंकी सास भी कभी बहु थी 2' या मालिकेत ऑनस्क्रीन भाऊबहिणीची भूमिका साकारणारे कलाकार खऱ्या आयुष्यात एकमेकांना डेट करत आहेत. अभिनेत्रीने खुद्द याची जाहीर कबुली दिली आहे. अफेअरच्या चर्चा खऱ्या असल्याचं तिने म्हटलंय.

ऑनस्क्रीन भावालाच डेट करतेय 'क्योंकी 2'मधील अभिनेत्री; स्वत:च केला खुलासा
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 12, 2025 | 8:08 AM
Share

मालिका किंवा चित्रपटात एकत्र काम करताना अनेकदा कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडतात. सेटवरच त्यांच्यात प्रेमाची कळी फुलते. मग ऑनस्क्रीन त्यांच्या भूमिका कोणत्याही असो.. ऑफस्क्रीन मात्र त्यांची केमिस्ट्री हिट असते. ऑनस्क्रीन एकमेकांच्या भाऊबहिणीच्या, दीर-वहिनीच्या भूमिका साकारलेले कलाकारसुद्धा खऱ्या आयुष्यात प्रेमात पडले आहेत. असंच काहीसं सध्या ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेच्या सेटवर पहायला मिळतंय. यामध्ये खलनायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री शगुन शर्माने तिच्या लव्ह-लाइफबद्दल मोठा खुलासा केला आहे. मालिकेतील सहकलाकार अमन गांधीला डेट करत असल्याचं तिने सांगितलं आहे. रंजक गोष्ट म्हणजे, या मालिकेत अमन आणि शगुन हे भाऊ-बहिणीच्या भूमिकेत आहेत. अमन शगुनच्या छोट्या भावाची भूमिका साकारतोय.

‘हॉटरफ्लाय’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत शगुन म्हणाली, “आमच्या अफेअरच्या चर्चा खऱ्या आहेत. परंतु आमची लव्ह-स्टोरी मालिकेच्या सेटवर सुरू झाली नाही. आम्ही त्याआधीपासूनच एकमेकांना ओळखत होतो. मालिकेत एकत्र काम करताना आमच्यात अधिक जवळीक निर्माण झाली.” याआधी अमननेही एका पॉडकास्टमध्ये शगुनला वर्षभरापासून डेट करत असल्याचा खुलासा केला होता. शगुनने पुढे सांगितलं की जेव्हा तिला ‘क्योंकी सास भी कभी बहू थी 2’ची ऑफर मिळाली होती, तेव्हा अमनने आधीच हृतिक विरानीच्या भूमिकेला साइन केलं होतं. त्यामुळे त्याच्या मोठ्या बहिणीची भूमिका स्वीकारण्याआधी शगुनने त्याला विचारलं होतं. ऑनस्क्रीन भाऊ-बहिणीची भूमिका साकारण्यास तुझी काही हरकत नसेल तर मी ही ऑफर स्वीकारते, असं शगुनने अमनला विचारलं होतं.

सुरुवातीला सेटवर या दोघांविषयी कोणालाच काही माहीत नव्हतं. परंतु दोन महिन्यांनंतर त्यांनी सर्वांना आपल्या रिलेशनशिपची माहिती दिली. काही आठवड्यांपूर्वीच शगुन अमनच्या पॉडकास्टमध्ये झळकली होती. या पॉडकास्टमध्ये ती म्हणाली होती, “आज मी या ठिकाणी याच व्यक्तीमुळे (अमन) आहे. आम्ही खूप चर्चा केली. अखेर अमनने मला खात्री पटवून दिली की मी ही भूमिका साकारायला हवी. खरं सांगायचं झालं तर, ऑनस्क्रीन त्याच्या बहिणीची भूमिका साकारणं माझ्यासाठी फार अवघड नाही. कारण आमच्यात बरेच भावनिक सीन्स आहेत. भावनिकदृष्ट्या एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत असल्याने हे सीन्स करणं सोपं जातं. शिवाय आम्ही एकत्र जेवतो, एकमेकांसोबत जास्त वेळ घालवतोय, हे मला अधिक आवडतंय.”

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.