‘क्योंकी सास भी कभी बहू थी 2’च्या एका एपिसोडसाठी स्मृती इराणी किती पैसे घेते माहितीये का? ऐकून बसेल धक्का
‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ ही मालिका अतिशय लोकप्रिय ठरली होती. आता या मालिकेचा दुसरा सीझन येत आहे. त्यासाठी स्मृती इराणीने किती मानधन घेतले असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून क्योंकी सास भी कभी बहू थी ओळखली जाते. आता अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा ही मालिका चर्चेत आली आहे. या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. या मालिकेत स्मृती इराणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यावेळीही तिची जोडी अमर उपाध्यायसोबत जमणार आहे. ही मालिकेची निर्मिती एकता कपूर करत आहे. पण या मालिकेसाठी स्मृती इराणी किती मानधन घेत आहे तुम्हाला माहिती आहे का?
स्मृती इराणी किती फी घेत आहे?
‘क्योंकी सास भी कभी बहू थी 2’ या मालिकेसाठी स्मृती इराणी मोठी फी आकारत आहे. इंडिया फोरमच्या अहवालानुसार, स्मृती इराणी तिच्या आयकॉनिक तुलसीच्या भूमिकेसाठी प्रत्येक एपिसोडसाठी 14 लाख रुपये फी घेत असल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याशिवाय, असंही कळतंय की स्मृती इराणी Z+ सुरक्षेत शूटिंग करत आहे. सेटवर कठोर प्रोटोकॉल पाळले जात आहेत, ज्यात फोन टॅपिंग आणि प्रवेशावर निर्बंध यांचा समावेश आहे.
वाचा: व्हर्जिन बायको शोधू नका.. ती एका रात्रीत संपते; प्रियांका चोप्राचे ते वक्तव्य चर्चेत
स्मृती इराणीचा शो कधीपासून सुरू होणार?
मनी कंट्रोलने सूत्रांच्या हवाल्याने लिहिलं आहे की, मालिकेच्या पोस्टरचं शूटिंग पूर्ण झालं आहे. प्रोमो शूटिंगच्या तयारीला सुरुवात झाली आहे. स्मृती इराणीच्या या पुनरागमनाची जोरदार तयारी सुरू आहे. मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. परंतु असं सांगितलं जात आहे की, मालिकेचा दुसरा सीझन पहिल्या सीझनच्या प्रदर्शनाच्या तारखेलाच रिलीज होऊ शकतो.
क्योंकी सास भी कभी बहू थी ही अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत तुलसीची कहाणी दाखवण्यात आली होती. मालिकेत दाखवलं गेलं होतं की, तुलसी जेव्हा सून होती तिला कशी वागणूक मिळायची आणि नंतर जेव्हा ती सासू बनली तेव्हा ती कशा वागत होती हे दाखवण्यात आले आहे. पहिल्या सीझनचा पहिला भाग 3 जुलै 2000 रोजी प्रदर्शित झाला होता. त्यामुळे आता दुसरा सीझन कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
