Money Heist अभिनेत्रीच्या घरात गणपतीचा फोटो, पोस्ट Viral

Money Heist अभिनेत्रीच्या घरात गणपतीचा फोटो, पोस्ट Viral
Esther Acebo

स्पॅनिश वेब सीरिज मनी हाइस्ट (Money Heist) या वेब सिरीजचे जगभर चाहते आहेत. आता एक मनोरंजक बाब त्यातल्या कलाकाराच्या बाबतीत समोर आलीय. स्पॅनिश अभिनेत्री एस्थर अॅसेबो (Esther Acebo) एका खास कारणामुळे चर्चेत आलीय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Jan 05, 2022 | 9:07 PM

स्पॅनिश वेब सीरिज मनी हाइस्ट (Money Heist) या वेब सिरीजचे जगभर चाहते आहेत. वेब सीरिजसोबतच त्यातल्या कलाकारांचंही मोठं आकर्षण चाहत्यांमध्ये आहे. आता एक मनोरंजक बाब त्यातल्या कलाकाराच्या बाबतीत समोर आलीय. या वेब सिरीजमध्ये स्टॉकहोमची भूमिका साकारणारी स्पॅनिश अभिनेत्री एस्थर अॅसेबो (Esther Acebo) एका खास कारणामुळे चर्चेत आलीय. भारतीयांना सुखावणारी ही बाब असून तिचा एक फोटो समोर आलाय. यात या अभिनेत्रीच्या घरात गणपतीचा फोटो दिसला. तो फोटो तिनं सोशल मीडिया(Social Media)वर शेअर केलाय.

चाहते खुश नेटफ्लिक्सवरची ही एक क्राइम ड्रामा वेब सिरीज असून एस्थर अॅसेबो त्यातील मुख्य अभिनेत्रींपैकी एक आहे. मनी हाइस्ट मालिका गेल्या महिन्यात संपत असताना, इन्स्टाग्रामवर एका युझरनं एस्थरचा एक फोटो शेअर केला. यामध्ये ती हिंदू देवता श्रीगणेशाच्या पेंटिंगच्या समोरच्या बाजुला उभी असलेली दिसतेय. त्या पोस्टमध्ये असाही दावा करण्यात आलाय, की तिच्या एका व्हिडिओमध्ये हिंदू देवतेचे पेंटिंग दिसले होते आणि ते तिच्या घराच्या भिंतीवर लावलेले दिसत होते. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आतापर्यंत आलेत पाच सिझन भारतातले मनी हाइस्टचे चाहते हे पाहून खुश दिसतायत. दरम्यान, मनी हाइस्टचे आतापर्यंत पाच सिझन आले आहेत. यात एस्थर अॅसेबो स्टॉकहोमची भूमिका साकारलीय.

Pushpa The Rise : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘पुष्पा’चा ‘अॅमेझॉन’वर होणार प्रिमियर!

Deepika Padukone | मॉडेलिंगपासून ते टॉप अभिनेत्री होण्यापर्यंतचा प्रवास, आजघडीला आलिशान आयुष्य जगते दीपिका पदुकोण!

Radhe Shyam Postponed | प्रभासच्या चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार! ‘राधे श्याम’चं प्रदर्शन लांबणीवर!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें