‘मेड इन इंडिया’ या गाण्यातील ही सुंदर अभिनेत्री आठवतेय? आता तिला ओळखणेही कठीण
90s मधील 'मेड इन इंडिया' या गाण्याची तेवढीच क्रेझ आहे. तसेच हे गाण्यात असणारी गायिक तथा अभिनेत्री अलिशा चिनाई देखील सर्वांच्या पसंतीस उतरली होती. तिच्या सौंदर्याने सर्वांनाच भुरळ घातली होती. पण आता ही सुंदर अभिनेत्री ओळखायला येणं देखील कठीण झालं आहे.

90s मधील गाण्याचे अल्बम हे फार प्रसिद्ध होते आणि ते आजही तेवढ्याच आवडीने ऐकले अन् पाहिले जातात. त्यातील एक गाणं म्हणजे ‘मेड इन इंडिया’. हे गाणं हे इतकं प्रसिद्ध झालं आहे की आजही त्या गाण्याचे चाहते आहेत आणि या गाण्याचं क्रेझ आजही कमी झालेल नाहीये. आजही हे गाणं फॅशन शोमध्ये किंवा कार्यक्रमात ऐकतो.
तिच्या सौंदर्याने सर्वांनाच भुरळ घातली होती
दरम्यान हे गाणेच नाही तर या गाण्यासोबत या गाण्यातील अभिनेत्री तथा गायिका अलिशा चिनाई देखील रातोरात प्रसिद्ध झाली होती. तिच्या सौंदर्याने सर्वांनाच भुरळ घातली होती. तसेच या गाण्यातील अलिशा आणि मिलिंद सोमणची जोडी देखील हीट ठरली होती. पण आता या अभिनेत्रीला ओळखणेही कठीण झाले आहे. तिला तब्बल एवढ्या वर्षांनी ओळखणे खरंच कठीण झाले आहे.
पती राजेशपासून घटस्फोट अन् नंतर आलेल्या अडचणी
ती बऱ्याच अडचणींमधून आणि कठिण काळातून गेली आहे. तिचा पती राजेशपासून घटस्फोटानंतर तिला बऱ्याच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागल्याचं तिने सांगितले. एका मुलाखतीदरम्यान अलिशाने सगळ्या गोष्टींबद्दल अगदी उघडपणे सांगितले आहे. ती म्हणाली, “मी पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि खिशात काहीही नसताना पळून गेले.”
View this post on Instagram
‘क्वीन ऑफ इंडिपॉप’ म्हटलं जायचं
अलिशा चिनाईने अनेक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींसाठी पार्श्वगायन केले आहे. तिच्या आवाजात अशी जादू आहे की एकदा तिचे गाणे ऐकले की ते विसरू शकत नाहीत. तसेत तिला ‘क्वीन ऑफ इंडिपॉप’ असं म्हटलं जाऊ लागलं.
अलिशाला आता ओळखणेही कठीण
आताही अलिशा चिनॉय इन्स्टाग्रामवर बरीच सक्रिय आहे आणि ती वारंवार तिचे गाण्याचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करते. अलिकडेच तिचा एक व्हिडिओ खूप लोकप्रिय झाला. पण तिच्या बदललेल्या लूकमुळे सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. व्हिडिओमध्ये, अलिशा एका स्टेजवर परफॉर्म करताना दिसली आणि ती खूपच बदललेली दिसत आहे. तिला ओळखणेही कठीण होत आहे.
View this post on Instagram
वैयक्तिक आयुष्य चढ-उतारांनी भरलेले आहे.
अलिशा चिनॉयचे वैयक्तिक आयुष्य चढ-उतारांनी भरलेले आहे. तिने 1986 मध्ये तिचे मॅनेजर राजेश झवेरीशी लग्न केले होते, परंतु1994 मध्ये त्यांचे नाते तुटले. 1995 मध्ये, अलिशा तिच्या गाण्यांमुळे तसेच संगीतकार आणि गायक अनु मलिक यांच्यावरील आरोपांमुळे चर्चेत होती. अलिशाने अनु मलिकवर छळाचा आरोप केला, त्यानंतर दोघांनी बराच काळ एकत्र काम केले नाही, परंतु नंतर ते शाहिद कपूरच्या “इश्क विश्क” चित्रपटासाठी पुन्हा एकत्र आले.
“तो खूप आव्हानात्मक काळ होता.”
तसेत तिने अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्यातील अनेक पैलूंबद्दल खुलासा केला. या काळात तिला आलेल्या आर्थिक संघर्षांबद्दल तिने उघडपणे सांगितले, ज्यात तिच्या वडिलांच्या कर्करोगाच्या उपचारांचाही समावेश होता. ती म्हणाली “तो खूप आव्हानात्मक काळ होता. एकीकडे मी प्रचंड यश अनुभवत होते, तर दुसरीकडे मी अनेक समस्यांशी झुंजत होती. मी माझ्या घटस्फोटातून जात होते. तो एक वेदनादायक काळ होता. प्रत्येक घटना मला अस्वस्थ करत होती, त्यामुळे मी माझ्या यशाचा आनंद घेऊ शकले नाही.”
