AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक तोळा सोनं 90 रुपये, 12 पैशांना लिटरभर दूध, 1950 साली भारतात कसे जगायचे लोक? महिन्याचे सामान फक्त…

India 1950 Inflation : 1950 साली भारतात सोनं फक्त 90 रुपये तोळा आणि एक लिटर दूध 12 पैशांना मिळत होतं. त्या काळातील महागाई, जीवनशैली आणि आजच्या दरांशी तुलना जाणून घेऊयात.

एक तोळा सोनं 90 रुपये, 12 पैशांना लिटरभर दूध, 1950 साली भारतात कसे जगायचे लोक? महिन्याचे सामान फक्त...
1950 InflationImage Credit source: AI
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 04, 2026 | 7:08 PM
Share

गेल्या काही काळापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपण बाजारात गेलो तर खिसा रिकामा झाला तरी पिशवी भरत नाही. गॅस, भाजीपाला, डाळी, तेल सर्वांचेच दर गगनाला भिडले आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आजपासून सुमारे साडेसात दशकांपूर्वी, म्हणजे 1950 च्या काळात महागाई किती होती? आपल्या आजोबा पंजोबाच्या काळात खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दर किती होते? तुम्ही जर आकडा वाचला तर तुम्हालाही विश्वास बसणार नाही. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गगनाला भिडलेल्या किमती

सध्याच्या काळात सामान्य माणसासाठी जेवण तयार करणेही महागले आहे. बाजारात गव्हाचे पीठ 40 ते 45 रुपये किलो, तूर डाळ 150 ते 180 रुपये किलो आणि मोहरीचे तेल 140 ते 160 रुपये लिटर दराने मिळते. तर शुद्ध देशी तूप 600 ते 700 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. भाजीपाला आणि मसाल्यांच्या किमतीही वाढत आहेत. या महागाईमुळे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. मात्र 75 वर्षांपूर्वी ही परिस्थिती वेगळी होती.

1950 च्या काळातील महागाई

1950 साली भारत नुकताच स्वतंत्र झाला होता आणि अर्थव्यवस्था वेगळी होती. त्या काळात रुपयाची किंमत जास्त होती आणि 1 रुपया म्हणजे 16 आणे असे होते. त्या काळी महागाई जवळजवळ नव्हतीच. गव्हाचे पीठ 10 ते 30 पैसे प्रति किलो होते. डाळी 20 ते 25 पैसे प्रति किलो होत्या. तेल 25 ते 30 पैसे प्रति लिटर, शुद्ध देशी तूप 2 ते 5 रुपये प्रति किलोने मिळते होते. तांदूळ सुमारे 12 पैसे प्रति किलो, साखर सुमारे 40 पैसे प्रति किलो, दूध सुमारे 12 पैसे प्रति लिटर, सोने 88 ते 90 रुपये तोळा होते. महिन्याचे सामान 10 ते 12 रुपयांमध्ये मिळत असे.

मातीची चूल आणि साधे जीवन

1950 च्या काळात स्वयंपाकघर खूप साधे आणि नैसर्गिक होते. गॅसऐवजी लोक मातीच्या चुलीवर स्वयंपाक करायचे. इंधनासाठी लाकूड, गोवऱ्या आणि कोळसा वापरला जायचा. भांडी पितळ, तांबे, कांस्य किंवा मातीची असायची. हळूहळू शिजवलेल्या अन्नामुळे चव आणि पौष्टिकता टिकून राहायची. तसेच फ्रिज नसल्यामुळे थंड पाण्यासाठी माठ वापरले जायचे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी