AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘डोला रे डोला’च्या शूटिंगवेळी 4 महिन्यांची प्रेग्नेंट होती माधुरी दीक्षित? 24 वर्षानंतर समोर आलं सत्य

‘देवदास’मधील ‘डोला रे डोला’ गाण्याच्या शूटिंगवेळी माधुरी दीक्षित गर्भवती होती? अभिनेत्रीने 24 वर्षांनंतर तोडले मौन

'डोला रे डोला'च्या शूटिंगवेळी 4 महिन्यांची प्रेग्नेंट होती माधुरी दीक्षित? 24 वर्षानंतर समोर आलं सत्य
Image Credit source: Social media
| Updated on: May 31, 2026 | 2:49 PM
Share

Madhuri Dixit : बॉलिवूडमधील सर्वाधिक गाजलेल्या आणि अजरामर चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘देवदास’ या चित्रपटाची आजही प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता आहे. शाहरुख खान, ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकला. विशेषतः ‘डोला रे डोला’ हे गाणे आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट नृत्यगीतांपैकी एक मानले जाते.

मात्र, या गाण्याशी संबंधित एक अफवा गेली अनेक वर्षे चर्चेत होती. ‘डोला रे डोला’च्या चित्रीकरणादरम्यान माधुरी दीक्षित चार महिन्यांची गर्भवती होती असा दावा अनेकदा केला जात होता. आता जवळपास 24 वर्षांनंतर माधुरी दीक्षितने स्वतः या चर्चांवर भाष्य करत सत्य स्पष्ट केले आहे.

मुलाखतीत दिले स्पष्ट उत्तर

अलीकडेच माधुरी दीक्षितने The Indian Express ला दिलेल्या मुलाखतीत या विषयावर प्रतिक्रिया दिली. दिवंगत प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्या सहकारी रुबीना खान यांनी केलेल्या दाव्याबाबत माधुरीला विचारण्यात आले. त्यावेळी तिने अतिशय थेट आणि स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.

माधुरी म्हणाली, माझा मोठा मुलगा अरिनचा जन्म 2003 मध्ये झाला. त्यामुळे तुम्ही स्वतःच हिशोब लावू शकता. माधुरीचा मोठ्या मुलाचा जन्म 17 मार्च 2003 रोजी झाला होता. तर ‘देवदास’ हा चित्रपट 12 जुलै 2002 रोजी प्रदर्शित झाला होता. यापूर्वी 23 मे 2002 रोजी त्याचा प्रीमियर Cannes Film Festival मध्ये झाला होता. त्यामुळे त्या काळातील गर्भधारणेबाबतच्या चर्चांना माधुरीच्या या वक्तव्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे.

तब्येत बिघडली होती, पण कारण वेगळे

मुलाखतीदरम्यान माधुरीने ‘देवदास’च्या चित्रीकरणाच्या आठवणीही सांगितल्या. ती म्हणाली की, त्या काळात सतत प्रवास करावा लागत असल्याने तिची तब्येत थोडी बिघडली होती. मी सतत प्रवास करत होते. शूटिंगसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावपळ सुरू होती.

अनेकदा रात्रीच्या वेळी शूटिंग व्हायचे. त्यामुळे खूप थकवा यायचा. माझी तब्येत थोडी खराब होती पण त्यामागे कोणतेही विशेष कारण नव्हते असे तिने सांगितले. त्यामुळे त्या काळात तब्येत बरी नसल्यामुळे निर्माण झालेल्या चर्चांना गर्भधारणेशी जोडले गेले असावे असे मानले जात असल्याच तिने सांगितले.

Follow Us
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता... त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता... त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं.
परळीवाल्याला तर आता... मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्
परळीवाल्याला तर आता... मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्.
सरकारने आश्वासन पाळलं नाही तर... मनोज जरांगे पाटलांचे हॉस्पिटलमधून
सरकारने आश्वासन पाळलं नाही तर... मनोज जरांगे पाटलांचे हॉस्पिटलमधून.
Sunil Tatkare | लेकासाठी तटकरेंची खटाटोप? थेट शिंदेंची घेतली भेट, नेमक
Sunil Tatkare | लेकासाठी तटकरेंची खटाटोप? थेट शिंदेंची घेतली भेट, नेमक.
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक....