लग्नानंतर मला… सासू सासऱ्यांनी…; माधुरीने करियरच्या पीकवर असताना बॉलिवूड सोडले, सासरच्यांबद्दल ती स्पष्टच बोलली
करिअरच्या शिखरावर असताना माधुरी दीक्षितने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करत बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. त्यानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांनाही धक्का बसला होता. रणवीर इलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये माधुरीने याच सर्व गोष्टींबद्दल खुलासा केला आहे. लग्नानंतर सासू-सासऱ्यांसोबत तिचे नाते कसे होते, त्यांचा स्वभाव कसा आहे याबद्दल ती स्पष्टच बोलली.

बॉलीवूडची “धक-धक गर्ल”, माधुरी दीक्षित 90 च्या दशकात तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर होती. तिचे चित्रपट एकामागून एक हिट ठरत होते. तसेच तिची फॅन फॉलोईंगही वाढत होती. अनेक दिग्दर्शक अन् अभिनेते तिच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक होते. मात्र जेव्हा माधुरी तिच्या करिअरच्या शिखरावर होती. तिला चांगले चित्रपट ऑफर होत होते तेव्हा माधुरीने लग्न केलं अन् अचानक चित्रपटसृष्टी सोडली. तिच्या या निर्णयामुळे नक्कीच चाहत्यांना प्रचंड धक्का बसला. तिचे चाहते ती पुन्हा बॉलिवूडमध्ये येण्याची वाट पाहत होते. ती 2007 मध्ये पुन्हा चित्रपटांमध्ये परतली.
माधुरी तिच्या सासरच्या लोकांबद्दल काय म्हणाली?
माधुरी दीक्षितने 1999 मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले आणि ती स्थायिक झाली. ती भारताबाहेर न्यू यॉर्कला गेली. या काळात माधुरीने तिच्या कुटुंबाचे संगोपन केले आणि अरिन आणि रायन नेने ही दोन मुले जन्माला आली. माधुरीने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की लग्नानंतर तिला तिच्या सासरच्या लोकांकडून पाठिंबा मिळाला, ज्यांनी तिला तिची ओळख निर्माण करण्यास मदत केली.
“जेव्हा तुम्ही लग्न करता तेव्हा तुम्ही एका युनिटचा भाग बनता”
रणवीर इलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये, माधुरी याबाबत स्पष्टच म्हणाली की “जेव्हा तुम्ही लग्न करता तेव्हा तुम्ही एका युनिटचा भाग बनता आणि तुम्ही काहीही केले तरी ते युनिट नेहमीच त्याचा एक भाग असेल. म्हणून, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या युनिटचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. जर तुम्हाला आयुष्यात काही साध्य करायचे असेल तर त्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. म्हणूनच मी नेहमीच म्हणते की मी खूप भाग्यवान होते की जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मला माझ्या सासरच्या लोकांकडून खूप पाठिंबा मिळाला.”
View this post on Instagram
“मी अशा कुटुंबात लग्न केले”
माधुरी पुढे म्हणाली “मी अशा कुटुंबात लग्न केले जिथे सगळेच करतात. माझ्या सासूबाई 80 व्या वर्षी रिअल इस्टेट सांभाळतात. माझे सासरे वयाच्या 83 व्या वर्षी नोकरीतून निवृत्त झाले.त्यामुळे त्यांना समजते की एका महिलेची स्वतःची ओळख असणे महत्त्वाचे आहे. त्यांना माहित आहे की मी घर सांभाळेन, परंतु हे देखील महत्त्वाचे आहे की मी एक व्यक्ती म्हणून काहीतरी करत आहे आणि मी त्यात समाधानी आहे. मी माझ्या युनिटसाठी एक व्यक्ती म्हणून देखील काम करत आहे, कारण तुम्ही तुमच्या युनिटमध्ये देखील योगदान देत आहात.”
“मिसेस देशपांडे” माधुरीची नवी वेब सीरीज
माधुरी दीक्षितच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच “मिसेस देशपांडे” या रहस्यमय-थ्रिलर वेब सिरीजमध्ये दिसणार आहे, जी 19 डिसेंबरपासून जिओ-हॉटस्टारवर प्रसारित होईल. काही दिवसांपूर्वीच या वेब सीरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, ज्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्साह निर्माण झाला आहे.
