AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणवीर समोर आला तर त्याला…, ‘महाभारत’ फेम भीमने रणवीरला दिली धमकी, म्हणाला, ‘धर्म वाचवायचा असेल तर…’

Ranveer Allahbadia Controversy: 'धर्म वाचवायचा असेल तर...', रणवीरच्या वादग्रस्त वक्तव्यावर 'महाभारत' फेम भीमने व्यक्त केला संताप, म्हणाला, 'धर्म वाचवायचा असेल तर...', सध्या सर्वत्र रणवीर अलाहाबादिया याची चर्चा...

रणवीर समोर आला तर त्याला..., 'महाभारत' फेम भीमने रणवीरला दिली धमकी, म्हणाला, 'धर्म वाचवायचा असेल तर...'
| Updated on: Feb 15, 2025 | 1:43 PM
Share

Ranveer Allahbadia Controversy: प्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रणवीर अलाहाबादिया याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. समय रैना याच्या शोमध्ये आई-वडिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे रणवीर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यानंतर अनेक एफआयआर देखील दाखल करण्यात आल्या आहे. शिवाय अनेक सेलिब्रिटी देखील रणवीर याच्या विरोधात संताप व्यक्त करताना दिसत आहेत. आता ‘महाभारत’ मालिकेत भीमची भूमिका साकारणाऱ्या WWE रेसलर सौरव गुर्जर याने देखील रणवीर याला धमकी दिली आहे.

सौरव गुर्जर याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘हा (रणवीर अलाहाबादिया) माफीच्या लायकीचा नाही. आज आपण यावर कारवाई केली नाही तर, उद्या दुसरा, तिसरा, चौथा अशाच प्रकारचे आपत्तीजनक वक्तव्य करेल. जर आपल्याला पुढील पिढी, व्यवस्था आणि धर्म वाचवायचा असेल तर, अशा लोकांवर कारवाई होणं गरजेचं आहे. ज्यामुळे पुढे असं काही करण्याचा कोणी विचार करणार नाही…’

पुढे सौरव म्हणाला, ‘मझी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला विनंदी आहे की, कारवाई झाली पाहिजे. त्याने (रणवीर) आई – वडिलांवर घाणेरडे शब्द बोलले. असा निर्लज्ज माणूस स्वतःच्या आई – वडिलांच्या समोर कसा उभा राहते मला समजत नाही. मला इतका राग येतो की, मी या व्यक्तीला मुंबईत कुठेही, कोणत्याही पार्टीत, कोणत्याही शोमध्ये भेटलो तर त्याची सुरक्षा किंवा जगातील कोणतीही शक्ती त्याला वाचवू शकणार नाही. त्याने माफी मागितली असली तर कारवाई होणं गरजेचं आहे…’ सध्या सौरव याची सोशल मीडियावर पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

कुठं पळाला रणवीर अलाहबादिया?

रणवीर याच्या विरोधात देशातील विविध राज्यात गुन्हे दाखल झाले आहेत. पण प्रकरण अधिक तापत असल्याचं लक्षात येतात रणवीर फरार झाला आहे. आई-वडीलासंबंधी अश्लाघ्य टीका करणारा रणवीर अलाहबादिया याने समाज माध्यमावरच माफीचा ड्रामा रंगवला. पण तो अचानक गायब झाला आहे. त्याचा फोन बंद आहे, तर घराला सुद्धा भलं मोठं ताळं लागलंय. सध्या पोलीस रणवीरच्या शोधात आहेत.

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल