Krishna: महेश बाबूच्या वडिलांचा ‘तो’ खास रेकॉर्ड; भल्याभल्यांनाही मोडणं शक्य नाही

काळाच्या पुढचा विचार करणारा साऊथ सुपरस्टार; महेश बाबूच्या वडिलांविषयी खास गोष्टी..

Krishna: महेश बाबूच्या वडिलांचा 'तो' खास रेकॉर्ड; भल्याभल्यांनाही मोडणं शक्य नाही
KrishnaImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 10:21 AM

मुंबई- दिग्गज तेलुगू अभिनेते कृष्णा यांचं आज (मंगळवार) निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. सोमवारी मध्यरात्री कृष्णा यांना कार्डिॲक अरेस्टमुळे हैदराबादमधील रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं होतं. आंध्रप्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यात बुरीपलेम इथं त्यांचा जन्म झाला होता. घट्टमनेनी शिवा राम कृष्णमूर्ती असं त्यांचं मूळ नाव आहे. 1960 दशकाच्या सुरुवातीला त्यांनी छोट्या भूमिका साकारत तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 1965 मध्ये त्यांनी दिग्दर्शक अदुर्थी सुब्बा राव यांच्या ‘थिने मनसुलू’ या चित्रपटात पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

कृष्णा यांनी केवळ प्रेक्षकांनी मनं जिंकली नाहीत तर तेलुगू चित्रपटात नवनवीन प्रयोगसुद्धा केले. सिनेमॅटिक कल्पना, थीम, तंत्रज्ञान आणि व्हिज्युअल स्टाइलच्या बाबतीत ते नेहमी काळाच्या पुढचा विचार करायचे. ‘गुडाचारी 116’ या तिसऱ्या चित्रपटानंतर त्यांची लोकप्रियता आणखी वाढली.

हे सुद्धा वाचा

आवे कल्लू, साक्षी, जेम्स बाँड 777, एजंट गोपी यांसारख्या चित्रपटात त्यांनी काम केलं. या चित्रपटांनी त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. स्पाय थ्रिलर चित्रपटांमुळे ते ‘द आंध्र जेम्स बाँड’ या नावानेही ओळखले जाऊ लागले. चित्रपटांसोबतच ते त्यांच्या शिस्तीमुळे आणि कामाच्या सवयींमुळे खास ओळखले जायचे.

यशाच्या शिखरावर असताना ते प्रत्येक दिवशी तीन शिफ्टमध्ये काम करत विविध प्रोजेक्ट्सचं शूटिंग करायचे. लोकप्रियतेमुळे कृष्णा यांच्यावर चित्रपटांच्या ऑफर्सचा वर्षाव होऊ लागला. एका वर्षात ते सर्वसाधारणपणे 10 चित्रपट करायचे. 1970 मध्ये त्यांनी 16 चित्रपटांमध्ये तर 1972 मध्ये त्यांनी 18 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. याच कारणामुळे ते तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखले जाऊ लागले होते.

कृष्णा यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीला अत्याधुनिक चित्रपट-निर्मिती तंत्रज्ञानाची ओळख करून दिली होती. त्यांचा ‘अल्लुरी सीताराम राजू’ हा पहिला असा तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपट होता, जो सिनेमास्कोपमध्ये चित्रित झाला होता. त्यांचा दिग्दर्शनातील पहिला चित्रपट ‘सिंहासनम’ हा 70 मिमी फिल्मवर बनला होता. त्यांच्या करिअरमधील 200 वा चित्रपट ‘इनाडू’ हा पहिला ईस्टमन कलरमधील चित्रपट होता.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.