Maithili Thakur Election Result : मैथिली ठाकूर मतमोजणीत पुढे कि मागे, 25 वर्षाच्या गायिकेची पहिली प्रतिक्रिया काय?
Maithili Thakur Election Result : काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नामुळे मैथिली ठाकूर हे नाव देशभरात सर्वांना माहित झालं. पत्रकाराने मैथिली ठाकूर यांना मतदारसंघाच्या ब्लू प्रिंटबद्दल प्रश्न विचारला. पण तिला तो फिल्म बद्दल विचारतोय असं वाटलं.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर सध्या देशाच लक्ष लागलं आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज येणार हे स्पष्ट आहे. कारण एनडीए आणि महाआघाडीच्या जागांमध्ये मोठं अंतर आहे. हे अंतर भरुन निघणं जवळपास अशक्य आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भोजपुरी स्टार सुद्धा आपलं नशीब आजमवत आहेत. खेसारी लाल यादव, रितेश पांडे, मैथिली ठाकूर, पवन सिंहची पत्नी ज्योती सिंह सारखे सेलिब्रिटी बिहारमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. गायिका मैथिली ठाकूर आपल्या लोकगीतांसाठी ओळखली जाते. बिहारमध्ये तिचं खूप नाव आहे. भाजपने मैथिलीला अलीनगरमधून तिकीट दिलं. मैथिली जनतेसाठी काय करणार? या बद्दल बिहारमध्ये उत्सुक्ता आहे.
मैथिलीने निवडणूक प्रचारात खूप मेहनत केली. निकालाचे अपडेट्स पाहता सिंगर मैथिलीची मेहनत फळाला येणार असं दिसतय. आतापर्यंत जितक्या राऊंडची मतमोजणी झालीय, त्यात मैथिली अजूनपर्यंत आघाडीवर आहे. मैथिलीने या बद्दल समाधान आणि आनंद व्यक्त केला.
मैथिलीने काय प्रतिक्रिया दिली?
“मला माझं यश दिसतय. मी तुमच्या न्यूजच्या माध्यमातून पाहतेय, काही काऊंटिग एजेंट्स सुद्धा सांगतायत की अलीनगर विधानसभा मतदारसंघातून मी आघाडीवर आहे. मी सध्या टीव्ही समोर बसली आहे. मी मागच्या काही निवडणुकीत पाहिलय की, निकाल वर-खाली होतात. त्यामुळे मला जो पर्यंत विजयाचं प्रमाणपत्र मिळत नाही, तो पर्यंत मी संतुष्ट होणार नाही” अशी प्रतिक्रिया मैथिलीने दिली.
View this post on Instagram
त्या उत्तरामुळे मैथिली देशभरात फेमस
काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नामुळे मैथिली ठाकूर हे नाव देशभरात सर्वांना माहित झालं. पत्रकाराने मैथिली ठाकूर यांना मतदारसंघाच्या ब्लू प्रिंटबद्दल प्रश्न विचारला. पण तिला तो फिल्म बद्दल विचारतोय असं वाटलं. त्यावर मैथिली यांनी ‘मी हे सर्वांसोबत कसं शेअर करू? ही पूर्णपणे वैयक्तिक आणि गोपनीय बाब आहे’ असं उत्तर दिलं. मैथिलीशिवाय खेसारी लाल यादव सुद्धा पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात उतरला आहे. तो छपरा येथून आरजेडीचा उमदेवार आहे.
