AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाईजानचं नाव ऐकताच भडकली मलायका अरोरा; म्हणाली, ‘सलमान खान याने मला…’

मलायका अरोरा तिच्या प्रोफेशन आयुष्यामुळे नाही तर, कायम तिच्या खासगी आयुष्यात होणाऱ्या चढ-उतारामुळे चर्चेत असते. सलमान खान याच्या भावाची पहिली पत्नी मलायका अरोरा भाईजानचं नाव ऐकताचं भडकली आणि म्हणाली...

भाईजानचं नाव ऐकताच भडकली मलायका अरोरा; म्हणाली, 'सलमान खान याने मला...'
भाईजानचं नाव ऐकताच भडकली मलायका अरोरा; म्हणाली, 'सलमान खान याने मला...'
| Updated on: Jan 27, 2023 | 9:36 AM
Share

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशन आयुष्यामुळे नाही तर, कायम तिच्या खासगी आयुष्यात होणाऱ्या चढ-उतारामुळे चर्चेत असते. मलायकाने पहिलं लग्न अभिनेता सलमान खान याचा भाऊ अरबाज खान याच्यासोबत केलं. मलायका आणि अरबाज यांची ओळख एका फोटोशूट दरम्यान झाली होती. असं सांगितलं जातं. पहिल्या ओळखीतच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर १९९१ मध्ये लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. अरबाज आणि मलायका यांच्या मुलाचं नाव अरहान आहे. अरहान सध्या परदेशात शिक्षण पूर्ण करत आहे.

अरबाज आणि मलायका यांचं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या १९ वर्षांनंतर दोघे विभक्त झाले. अरबाज आणि मलायका यांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर देखील मलायका तुफान चर्चेत आली. एवढंच नाही तर, एक वेळ अशी आली, जेव्हा मलाकाला इंडस्ट्रीमध्ये जे स्थान निर्माण केलंय ते स्वबळावर केलं असल्याचं सांगण्याची वेळ आली.

इंडस्ट्रीची ड्रामा क्विन राखी सावंत (Rakhi Sawant) हिने मलायकावर निशाण साधला होता. अभिनेता सलमान खान याच्या कुटुंबातील असल्यामुळे मलायकावर आयटम गर्लचा ठपका लागला नाही, असं राखीने म्हटलं होतं. राखीने साधलेल्या निशाण्यावर मलायकाने देखील सडेतोड उत्तर दिलं. ज्यामुळे मलायका प्रचंड चर्चेत आली होती.

खान कुटुंबातील असल्यामुळे मलायकाला इंडस्ट्रीमध्ये संधी मिळाली असल्याचा आक्षेप देखील राखीने मलायकावर घेतला होता. यावर संताप व्यक्त करत मलायका म्हणाली, ‘असं असतं तर मला सलमान खान याच्या प्रत्येक सिनेमात आयटम सॉन्ग करायला हवा होता. मी स्वबळावर इंडस्ट्रीमध्ये स्थान निर्माण केलं आहे. मला सलमान खान याने घडवलेलं नाही…’ असं देखील मलायका म्हणाली.

मलायकाने आतापर्यंत अनेक सिनेमांत आयटम सॉन्ग करत चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘दिल से’ सिनेमात ‘छय्या-छय्या’ आणि ‘दबंग’ सिनेमात ‘मुन्नी बदनाम हुई’ गाण्यावर आयटम सॉन्ग केला होता. मलायकाच्या या गाण्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगत असते. मलायका कायम तिच्या डान्स आणि घायाळ अदांमुळे चर्चेत असते.

मलायकाने अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. काही वर्षांपूर्वी मलायका आणि अर्जुन यांनी सर्वांसमोर त्यांच्या नात्याचा स्वीकार केला. आता अनेक ठिकाणी दोघे एकत्र दिसतात. शिवाय सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करत असतात.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?