AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिया आघाडीचा महाएल्गार! विरोधी खासदारांचा संसदेपासून ते निवडणूक आयोगापर्यंत आज लाँगमार्च, मतदार यादीतील गोंधळाविरोधात मोर्चा

INDIA Bloc Protest Against Election Commission: फॉर्म 6 वरून सुप्रीम सुनावणी सुरू असतानाच आज नवी दिल्लीत इंडिया आघाडीचे खासदार केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा घेऊन जाणार आहेत. महाराष्ट्रासह नवी दिल्ली आयोगाविरोधातील आंदोलनाचे केंद्रबिंदु ठरत आहे. काय आहे याविषयीची अपडेट?

इंडिया आघाडीचा महाएल्गार! विरोधी खासदारांचा संसदेपासून ते निवडणूक आयोगापर्यंत आज लाँगमार्च, मतदार यादीतील गोंधळाविरोधात मोर्चा
इंडिया आघाडी
| Updated on: Oct 06, 2026 | 7:22 AM
Share

केंद्रीय निवडणूक आयोग गेल्या 15 दिवसांपासून विरोधी पक्षांच्या हिटलिस्टवर आला आहे. मतचोरी आणि मतदार याद्यांमधील गोंधळाचा आरोप करत विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. 10 ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनापूर्वीच दिल्ली आज विरोधकांच्या आवाजाने दणाणणार आहे. आज इंडिया आघाडीतील (INDIA Bloc) खासदार मोठा मोर्चा काढणार आहेत. गेल्या आठवड्याच्या अखेरीस शुक्रवारी अभिजीत दिपके यांनी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आंदोलन केले तर रविवारी ठाकरे बंधूंनी मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना धारेवर धरले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दोन वर्षानंतर विरोधकांनी मरगळ झटकल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे.

विरोधकांचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार

निवडणूक आयोगाच्या कथित वादग्रस्त कारभाराविरोधात, विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेविरोधात(SIR) आणि कथित मतचोरीविरोधात देशभरात विरोधी पक्ष एकवटले आहेत. आज दिल्लीत विरोधी पक्षातील खासदारांचा लाँगमार्च निघणार आहे. संसद भवनातील मकर द्वारापासून ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. आज 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता हा मोर्चा निघेल.

मोर्चाकडे देशाचे लक्ष

या मोर्चामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पक्षाचे नेते, तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांचे प्रमुख नेते, खासदार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने विरोधकांची एकजूट दिसणार आहे. निवडणूक प्रक्रियेत, मतदार नोंदणीत पारदर्शकेतीची मागणी विरोधकांनी केली आहे. ज्ञानेश कुमार हटाव ही प्रमुख मागणी आहे. तर यापूर्वीचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीचीही मागणी केली जात आहे.

AAP चे एकला चलो रे

आप, डाव्या पक्षांनी गेल्या आठवड्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात जंतरमंतरसह नवी दिल्लीत ठिकठिकाणी आंदोलन केले. आम आदमी पक्षाने त्यातून शक्ती प्रदर्शन केले. तर आज काँग्रेस, समाजवादी पक्ष, डावे पक्ष, उद्धव सेना, राष्ट्रवादी आणि इंडिया आघाडीतील इतर प्रमुख पक्ष या आंदोलनात सहभागी होणार आहे. घटक पक्षातील खासदारांनी एल्गार पुकारल्याने दिल्लीतील वातावरण तापले आहे. गेल्यावेळी पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळवण्याचा प्रयत्न झाल्याने यावेळी पोलिसांनी मोठी खबरदारी घेतली आहे.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?