आई मलायकाबद्दल मित्रांनी ‘तो’ प्रश्न विचारताच मुलगा अरहानला देता येईना उत्तर

अभिनेत्री मलायका अरोरा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या मुलाविषयी व्यक्त झाली. मलायका आणि अरबाज यांना अरहान हा 21 वर्षांचा मुलगा आहे. अरहानला त्याचे मित्र मलायकाबद्दल एक प्रश्न विचारतात, मात्र त्याचं उत्तर काय द्यावं हे त्यालाही कळत नसल्याचा खुलासा मलायकाने केला आहे.

आई मलायकाबद्दल मित्रांनी 'तो' प्रश्न विचारताच मुलगा अरहानला देता येईना उत्तर
Malaika Arora and Arhaan KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 3:37 PM

अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करू लागली होती. मात्र आता त्या दोघांच्याही ब्रेकअपच्या चर्चा आहेत. मलायका आणि अरबाज यांना 21 वर्षांचा मुलगा अरहान आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायका तिच्या मुलाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. तुझी आई खर्च भागवण्यासाठी काय काम करते, असा प्रश्न अरहानचे मित्र त्याला विचारतात, असं मलायकाने सांगितलं. त्यावर नेमकं काय उत्तर द्यावं, हे अरहानलाही समजत नसल्याचं तिने स्पष्ट केलं. ‘हार्पर बझार’ या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत मलायका म्हणाली, “एकेदिवशी माझ्या मुलाने सांगितलं, माझ्या मित्रांना हा प्रश्न पडतो की तू नेमकं काय काम करतेस? ते म्हणतात तिने चित्रपटात काम केलंय, गाण्यात झळकली आहे, ती व्हीजेसुद्धा (व्हिडीओ जॉकी) होती, मॉडेलसुद्धा आहे, ती टीव्हीवरही दिसते. पण मी नेमकं काय करते, याविषयी ते संभ्रमात आहेत.”

“पण मी नेमकं काय करते, या दुसऱ्यांना पडणाऱ्या प्रश्नाला आणखी का प्रोत्साहन देऊ? मला जे आवडतं, ते मी करते”, असं उत्तर मलायकाने दिलं. वयाची पन्नाशी गाठणारी मलायका अनेकदा तिच्या फिटनेसमुळेही चर्चेत असते. लोकांकडून मिळणाऱ्या कमेंट्सवर ती पुढे म्हणाली, “जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की वयाच्या 49 व्या वर्षीही तू खूप सुंदर दिसते, तेव्हा मला खूप छान वाटतं. मला वाटत नाही की त्यात त्यांना काही अपमानास्पद बोलायचं असतं. ते कौतुकच करतात. वयाच्या 49 वर्षीही इतकं फिट राहण्यासाठी मी बरीच मेहनत घेते. त्यामागे बरेच कष्ट घ्यावे लागतात. अखेर त्याचं फळ मला मिळतंय. अशी दिसण्यासाठी तू काय करतेस, असं कोणी विचारल्यावर मला खूप छान वाटतं.”

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. या ट्रोलिंगबद्दल ती म्हणाली, “खरं बोलायचं झाल्यास, जेव्हा कोणी माझ्याबद्दल वाईट लिहितं, तेव्हा मला त्रास होतो. पण तो आवाज बंद करून मी आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करते. मी जशी आहे, तसंच राहण्यासाठी खूप मेहनत करते. योगसाधना आणि ध्यान यांचं त्यात मोलाचं योगदान आहे.” मलायका आणि अरबाज हे लग्नाच्या 19 वर्षांनंतर विभक्त झाले. अरबाजने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसरं लग्न केलंय. तर मलायका अर्जुन कपूरला डेट करत होती.

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.