AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणखी एका अभिनेत्रीच्या आत्महत्येने हादरली सिनेसृष्टी, घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

मल्याळम सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून लोकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्रीने आपले जीवन संपवले आहे. वयाच्या ३५ व्या वर्षी ती आपल्या घरात मृत अवस्थेत आढळली. आर्थिक संकटात असल्याने अभिनेत्रीने जीवन संपवल्याचं बोललं जात आहे.

आणखी एका अभिनेत्रीच्या आत्महत्येने हादरली सिनेसृष्टी, घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
renjusha menon
| Updated on: Oct 30, 2023 | 4:21 PM
Share

मुंबई : मल्याळम अभिनेत्री रेंजुषा मेनन ( Renjusha Menon Death ) सोमवारी सकाळी तिरुअनंतपुरममधील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. 35 वर्षीय अभिनेत्रीने गळफास घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ती तिचा पती आणि अभिनेता मनोजसोबत त्या फ्लॅटमध्ये राहत होती. ती आर्थिक संकटातून जात असल्याचं बोललं जात आहे. आत्महत्येची प्राथमिक माहिती असली तरी तिच्या मृत्यूचा तपास पोलीस करत आहेत.

कोचीची राहणारी अभिनेत्री मंजुषाने टीव्ही मालिकांमध्ये येण्यापूर्वी टीव्ही शो अँकर म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली. तिने ‘स्त्री’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर अभिनयाची सुरुवात केली.

टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमधील तिच्या सहाय्यक भूमिकांसाठी ती प्रसिद्ध होती. या भूमिकांमुळे ती घराघरात पोहोचली. ज्याने तिला लोकप्रियता मिळवून दिली. या बातमीने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तिच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत आहेत.

गेल्या महिन्यात आणखी एक मल्याळम अभिनेत्री अपर्णा नायर हिच्या आत्महत्येमुळे सिनेसृष्टीला धक्का बसला होता. अपर्णा तिचा पती आणि मुलांसोबत राहत होती, असे पोलिसांनी सांगितले.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.