एका रात्रीत यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्रींना एक चूक पडली महागात, अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात ‘या’ अभिनेत्रींचं करियर झालं उद्ध्वस्त..
एका रात्रीत यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्रींना एक चूक पडली महागात, अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात 'या' अभिनेत्रींचं करियर झालं उद्ध्वस्त. आज कसं आयुष्य जगत आहेत अभिनेत्री, ममता कुलकर्णी हिने घेतला संन्यास, तर इतर अभिनेत्री...

प्रेमात असलेल्या व्यक्तीला आयुष्यात सर्वकाही चांगलं वाटत असतं. ती व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे की नाही याचा विचार देखील करत नाही. बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींसोबत देखील असंच काही झालं आहे. चित्रपटांमध्ये आपण अनेक वेगवेगळ्या लव्हस्टोरीज पाहिल्या आहेत. त्यामध्ये अभिनेत्री डॉनच्या प्रेमात पडतात, ज्यामुळे अभिनेत्रींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. बॉलिवूडमध्ये देखील अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचं आयुष्य देखील अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात उद्ध्वस्त झालं. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना अचानक अभिनेत्री अचानक गायब झाल्या. तर आता या अभिनेत्री आहेत कोण याबाबत जाणून घेऊ…
ममता कुलकर्णी
या अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री ममता कुलकर्णी आहे. आता अभिनेत्री संन्यास घेतला आहे. पण संन्यास घेण्यापू्र्वी ममता अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली. ममता कुलकर्णी ही डॉन दाऊद इब्राहिमचा गुंड छोटा राजनच्या प्रेमात होती. अनेक वर्ष तिने छोटा राजनला डेट केलं. मात्र, जेव्हा छोटा राजननं भारत देश सोडला होता त्यानंतर ममता आणि त्याचं नातं संपलं. छोटा राजन नंतर ममता ड्रग माफिया विकी गोस्वामीला डेट करत असल्याची देखील चर्चा रंगली होती.
मोनिका बेदी
मोनिका बेदी हिने देखील चाहत्यांचं मनोरंजन केलंअनेक. सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. चित्रपटासोबतच मोनिका बेदी तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत राहिली आहे. कारण मोनिकाचे नाव अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसोबत जोडले जात होतं. मोनिका आणि अबू सालेमनं लग्न केल्याची देखील माहिती समोर आली. नात्यामुळे मोनिकाच्या अडचणीत वाढ.त्यांना अनेक वर्षे तुरुंगात काढावी लागली होती.
अनिता अयुब
अभिनेत्री अनिता अयुब ही सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अनिताचं नाव हे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद सोबत जोडण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक जावेद सिद्दीकी यांनी अनिताला चित्रपटात कास्ट करण्यास नकार दिला होता त्यामुळे जावेद यांच्या मृत्यूमागे दाऊदचा हात असल्याचं म्हटलं जात होतं.
मंदाकिनी
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मंदाकिनी ही राम तेरी गंगा मैली आणि डॉन दाऊद इब्राहिममुळे कायम सर्वांच्या आठवणीत आहे. मंदाकिनीने दाऊदसोबतचं नातं कधी स्वीकारलं नाही मात्र तिचा दाऊदसोबतचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर तिला करिअरमध्ये फार काही संधी मिळाली नाही आणि जवळपास इथेच तिच्या करिअरच्या अस्ताला सुरूवात झाली.
