AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajay Devgn | अजय देवगन याच्यासाठी रस्त्यावर ‘भीक मांगो आंदोलन’; ‘सिंघम’वर या कारणासाठी नाराज

'चांगला उपक्रम आहे. संपूर्ण समाजासाठी तुम्ही चांगलं काम करत आहात', अशा शब्दांत दुसऱ्या युजरने कौतुक केलं. 'बॉलिवूडमधल्या श्रीमंत भिकाऱ्यांसाठी मीसुद्धा पैसे देऊ इच्छितो', असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. तर अनेकांनी अजय देवगनला या जाहिरातीत टॅगसुद्धा केलं आहे.

Ajay Devgn | अजय देवगन याच्यासाठी रस्त्यावर 'भीक मांगो आंदोलन'; 'सिंघम'वर या कारणासाठी नाराज
अजय देवगणसाठी भीक मांगो आंदोलनImage Credit source: Twitter
| Updated on: Jul 24, 2023 | 12:26 PM
Share

नाशिक | 24 जुलै 2023 : बॉलिवूड सेलिब्रिटींची क्रेझ अनेकदा चाहत्यांमध्ये पहायला मिळते. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करण्यासाठी तयार असतात. मात्र दुसरीकडे असेही काही चाहते आहेत, जे सेलिब्रिटींवर थेट नाराजी व्यक्त करतात. या सेलिब्रिटींच्या जाहिरातींच्या निवडीवर अनेकदा प्रश्न उपस्थित केला जातो. इतकंच नव्हे तर जोरदार ट्रोलिंगनंतर अनेकदा कलाकारांना जाहीर माफी मागत माघार घ्यावी लागते. याआधी अक्षय कुमारला तंबाखूच्या ब्रँडच्या जाहिरातीबद्दल नेटकऱ्यांची माफी मागावी लागली होती. अजय देवगनच्या पान मसाला आणि ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातीवर अनेकदा तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. त्यावरून सोशल मीडियावर उपरोधिक मीम्ससुद्धा व्हायरल होतात. मात्र आता एका व्यक्तीने अजय देवगनच्या अशा जाहिरातींविरोधात थेट ‘भीक मांगो आंदोलन’ केलं आहे.

नाशिकच्या रस्त्यावर ‘भीक मांगो आंदोलन’ करत हा व्यक्ती अजय देवगनसाठी पैसे गोळा करतोय. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका स्कूटरवर हा व्यक्ती विविध बोर्ड घेऊन माइकमध्ये घोषणा करताना दिसतोय. ‘अजय देवगनसाठी भीक मांगो आंदोलन’, असं त्याच्या हाती असलेल्या फलकावर लिहिलेलं दिसतंय. या व्हायरल व्हिडीओमध्ये ही व्यक्ती माइकमध्ये बोलते, “मी ऑनलाइन गेमिंग आणि त्याच्या जाहिरातींविरोधात आंदोलन करत आहे. देवाच्या कृपेने या सेलिब्रिटींकडे सर्वकाही आहे आणि तरीसुद्धा ते ऑनलाइन गेमिंगसारख्या जाहिराती निवडतात. ज्याचा तरुणाईवर खूप वाईट परिणाम होतो.”

“मी हे भीक मांगो आंदोलन करत रस्त्यावर पैसे गोळा करणार आणि हे पैसे अजय देवगनला पाठवणार. ऑनलाइन गेमिंगसारख्या जाहिराती करू नये अशी विनंती त्याच्याकडे करणार. जर त्याला आणखी पैशांची गरज असले तर मी पुन्हा भीक मागेन आणि ते पैसे त्याला पाठवेन. पण अशा जाहिरातींचं प्रमोशन करणं थांबव असं आवाहन त्याला करेन. मी हे सर्व गांधीगिरी पद्धतीने करणार आहे”, असं तो पुढे म्हणतो.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ‘फक्त अजय देवगनच नाही तर इतरही सेलिब्रिटी अशा जाहिराती करतात. पण गुटखा आणि जुगारासारख्या जाहिरातींमध्ये सर्वाधिक अजयच झळकतो’, असं एकाने लिहिलं. तर ‘चांगला उपक्रम आहे. संपूर्ण समाजासाठी तुम्ही चांगलं काम करत आहात’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने कौतुक केलं. ‘बॉलिवूडमधल्या श्रीमंत भिकाऱ्यांसाठी मीसुद्धा पैसे देऊ इच्छितो’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. तर अनेकांनी अजय देवगणला या जाहिरातीत टॅगसुद्धा केलं आहे.

कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.