AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित ठाकरे यांना का मतदान करावं? मराठी अभिनेत्याने दिली 10 कारणं

निवडून आल्यानंतर काही काम करण्याची वेळ येईल तेव्हा..., अमित ठाकरे यांना का मतदान करावं? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने दिली 10 कारणं..., अभिनेत्याची सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल

अमित ठाकरे यांना का मतदान करावं?  मराठी अभिनेत्याने दिली 10 कारणं
| Updated on: Nov 14, 2024 | 8:07 AM
Share

राज्यात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीत रणधुमाळी माजली आहे. प्रचारांच्या तोफा धडाडल्या आहेत. एकमेकांवर वैखरी टीका सुरू आहे. अशात सेलिब्रिटी देखील त्यांच्या आवडत्या उमेदवारासाठी प्रचार करताना दिसत आहेत. सध्या कलाकारांची सोशल मीडिया पोस्ट आणि राजकीय मंचावरील भाषणं चर्चेचा विषय ठरत आहेत. अनेक सेलिब्रिटी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीदेखील अनेक कलाकार पुढे आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत मनसेचे 135 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. मुंबईतील माहीम मतदारसंघात स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमित ठाकरे यांच्यासाठी ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. पोस्ट करत संजय मोने यांनी अमित ठाकरे यांना का मतदार करावं…. याची एक दोन नाही तर 10 कारणं दिली आहे. सध्या संजय मोने यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

संजय मोने यांची फेसबुक पोस्ट

माझी सर्व कलाकारांना विनंती आहे… तुमचे विचार समाज ऐकतो, तुमची वाह वाह करतो. याचा अर्थ असा नाही कि तुम्ही म्हणाल ते सगळे लोक ऐकतील.आपल्या कलाकारांना समाज फक्त आणि फक्त एक मनोरंजन करणारी व्यक्ती म्हणून ओळखतो. तुम्ही गंभीर भूमिका करा किंवा विनोदी भूमिका करा तुम्ही फक्त काही क्षणांचं, त्यांचं वेळ घालवायचं एक खेळणं असता. कधीही तुमच्या खांद्यावर हात टाकून एक सेल्फी घेण्याइतकीच तुमची किंमत असते. तेव्हा या निवडणुकीसाठी उगाच प्रचार करून आपण परिस्थिती बदलू शकतो या भ्रमात राहू नका.आपला आत्म सन्मान विकू नका.कारण निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला कोणीही हिंग लावून विचारणार नाही.(हिंग लावून विचारणं हि एक म्हण झाली.प्रत्यक्षात हिंग महाग असतो)तेंव्हा या वेळी पक्ष नाही तर व्यक्तीला मतदान करा.

आता माझ्या माहीम मतदार संघाबद्दल. इथे बरेच उमेदवार आहेत. त्यातले बरेच विविध पक्षांची सफर करून आले आहेत. त्यांना स्वतःला तरी त्यांचा मूळ पक्ष आठवत असेल का?निशाणी म्हणजे पक्ष नाही.

माझ्या मतदार संघात श्री.अमित ठाकरे उमेदवार आहेत. त्यांना मत का द्यायचं? याची कारणं मला सांगावीशी वाटतात.

१) ते आधीपासून त्याच पक्षाशी निगडीत आहेत.

२) त्यांचा या मतदार संघाशी जन्मापासून संबंध आहे.

३) तरुण आहेत त्यामुळे नव्या पिढीचे जे काही प्रश्न आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत त्याबद्दल त्यांना चांगली माहिती आहे.

४) निवडून आल्यानंतर काही काम करण्याची वेळ येईल तेंव्हा समोर आलेला प्रश्न मराठी,हिंदी (ही लादली गेलेली भाषा आहे )किंवा इंग्रजी (ही आल्या तथाकथित मराठी समाजाने लादून घेतलेली भाषा आहे)या तीनही भाषेत आला तर त्याचा निदान अर्थ समजण्या इतकी त्यांची कुवत आहे.

५) त्यांच्या मतदार संघातले प्रश्न त्यांच्या वडिलांमुळे (मा.श्री.स्वरराज ठाकरे)त्यांना पूर्ण अवगत आहेत.

६) आता निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे राहिल्याच्या आधी कुठेही त्यांच्या बद्दल सर्व सामान्य जनतेत भीती धाक दपटशा अशी भावना नाही.

७) वेगात वाहन चालवून अपघात केल्याची एकही नोंद नाही.

८) एका कलाकार म्हणून मला सांगावेसे वाटते कि त्यांच्या पक्षाने कायम मला मानाचीच वागणूक दिली आहे.

९) त्यांच्या घराच्या आसपास असलेल्या सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन प्रश्न ते त्यांच्या पक्षाच्या मदतीने सोडवत आले आहेत.

१०) शिवाजी पार्क ला जर तुम्ही दिवाळीच्या सुमारास गेला असाल तर त्यांच्या पक्षाने एक जागा निश्चित केली होती तिथे या वर्षी काही हजार तरुण तरुणी येऊन दिवाळी एकत्रपणे साजरी करत होते.आणि पार अकरा बारा वाजे पर्यंत निर्धास्त पणे वावरत होते.

आता श्री.अमित ठाकरे यांना मत का देऊ नये याबद्दल खूप विचार करून मुद्दा सुचेना पण तरीही शोधला

१) श्री.अमित ठाकरे अनुभवी नाहीत. पण तो आपणच त्यांना निवडून दिलं तर सहज मिळू शकेल.

माहीम मतदार संघाबद्दल सांगायचं झालं तर, या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. मतदारसंघात मनसेकडून अमित राज ठाकरे, महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे सदानंद सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.