जो करना है कर लो म्हणतो, मला त्या आदित्यला धडा शिकवायचाय, अभिनेते संजय मोने भडकले

वॉरंटी पीरिएडमध्ये असलेल्या वॉशिंग मशिनमध्ये झालेल्या बिघाडाविषयी संजय मोने यांनी LG कंपनीच्या कस्टमर केअरला फोन केला (Sanjay Mone LG Customer Care )

जो करना है कर लो म्हणतो, मला त्या आदित्यला धडा शिकवायचाय, अभिनेते संजय मोने भडकले
अभिनेते संजय मोने


मुंबई : विविध कंपनींच्या कस्टमर केअरमधील एक्झिक्युटिव्हशी बोलताना येणारे अनुभव अनेक जण शेअर करत असतात. प्रख्यात अभिनेते संजय मोने (Sanjay Mone) यांनाही नुकताच चक्रावून टाकणारा अनुभव आला. वॉशिंग मशिनमध्ये झालेल्या बिघाडाची तक्रार करण्यासाठी मोनेंनी LG कंपनीच्या कस्टमर केअरला फोन केला होता. मात्र जो करना है करलो, असं उत्तर देणाऱ्या आदित्य नावाच्या एक्झिक्युटिव्हवर मोने चांगलेच भडकले आहेत. मला त्या आदित्यला धडा शिकवायचाय, असं म्हणत संजय मोने यांनी फेसबुकवरुन मित्रांकडे सल्ला मागितला आहे. (Marathi Actor Sanjay Mone shares experience of LG Customer Care Washing Machine Complaint)

वॉरंटी पीरिएडमध्ये असलेल्या वॉशिंग मशिनमध्ये झालेल्या बिघाडाविषयी संजय मोने यांनी LG कंपनीच्या कस्टमर केअरला फोन केला होता. मात्र वॉरंटी असतानाही कंपनीकडून पैसे भरण्यास सांगितल्याने मोनेंचा संताप झाला. त्यातच जो करना है करलो असं उत्तर दिल्यामुळे संजय मोने यांचा अधिकच संताप झाला आणि त्यांनी सोशल मीडियावरुन सल्ले मागवले आहेत.

संजय मोने यांची फेसबुक पोस्ट काय?

“एलजी कंपनीचं वॉशिंग मशीन गेल्या वर्षी जून महिन्यात विकत घेतलं. कालपासून कपडे धुवायला टाकल्यावर चक! चक! असा आवाज येतोय. म्हणून मी एलजी कस्टमर केअरला फोन केला. वॉरंटी पीरिएडमध्ये आहे असं सांगितलं. समोर आदित्य नावाचा माणूस (एक्झिक्युटिव्ह) बोलत होता. माझं म्हणणं ऐकून घेतल्यावर तो म्हणाला “लॉकडाऊनमुळे आम्ही वॉरंटी वगैरे सगळं देऊ शकत नाही. तुम्हाला येणाऱ्या माणसाचे 475 रुपये अधिक जर काही भाग खराब झाला असेल, त्याचे पैसे द्यावे लागतील” असं सांगितल्यामुळे वॉरंटीला काय अर्थ आहे? असा सवाल संजय मोने यांनी विचारला.

मला त्या “आदित्य”ला धडा शिकवायचाय

“मी त्याला सांगितलं की ग्राहक मंचाकडे तक्रार करेन त्यावर तो म्हणाला “जो करना वोह करलो. नहीं तो लॉकडाऊन के बाद आदमी आयेगा. आता यावर पुढे काय करता येईल? मला त्या “आदित्य”ला धडा शिकवायचाय. लॉकडाऊन काही आपण नाही घोषित केला ना? आपल्या भल्यासाठी तो आहे. शिवाय त्यांनी विक्री बंद केली नाहीये. ती चालूच आहे.” असं म्हणत “पुढे काय करू? यावर फालतू विनोदी उत्तरं नकोत” असा सल्ला मोनेंनी मागितला आहे. (Sanjay Mone LG Customer Care )

संबंधित बातम्या :

प्रत्येक डॉक्टर देव नसतो… वडिलांच्या मृत्यूला रुग्णालयच जबाबदार; अभिनेत्री संभावना सेठ लालबूंद

आईने विचारलं, लग्न झाल्यावर बायकोचा धर्म बदलशील? वाचा नसीरुद्दीन शाह काय म्हणाले….

(Marathi Actor Sanjay Mone shares experience of LG Customer Care Washing Machine Complaint)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI