सयाजी शिंदे यांच्या निशाण्यावर केंद्र सरकार, संतापात म्हणाले, ‘जगू देणारच नाही आणि मरु तर…’
मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनातील वृक्षतोडीला विरोध केला. आणि आंदोलनादरम्यान, सर्व नाशिककरांना एकत्र येण्यास सांगितलं... येथे गवताची काडी देखील तुटली नाही पाहिजे... असं म्हणत सयाजी शिंदे यांनी विरोध केला आहे.

Sayaji Shinde : जगात एकच सेलिब्रिटी आहे आणि तो म्हणजे झाड आहे… असं म्हणत अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधला. तपोवनात साधूग्रामसाठी 1800 वृक्षतोडीची तयारी महापालिकेने केल्याने पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमींनी आंदोलन करत तिव्र विरोध केला… कुंभमेळा साधूग्रामसाठी वृक्षतोड केली जाणार होती. अशात नाशिककरांसह पर्यावरण प्रमींनी वृक्षतोडीला विरोध केला आहे. नुकताच झालेल्या आंदोलनात सयाजी शिंदे यांनी सर्व नाशिककरांना सरकार विरोधात एकत्र येण्याचं आवाहन देखील केलं…
सयाजी शिंदे म्हणाले, ‘जगाच कोणताच सेलिब्रिटी नाही, जगात एकच सेलिब्रिटी आहे आणि तो म्हणजे झाड आहे… सेलिब्रिटी त्याला म्हणायचं जो जगवतो… जो ऑक्सिजन देतो… जो अन्न – पाणी दतो… जो सावली देतो… त्यालाच फक्त सेलिब्रिटी म्हणतो… त्यामुळे नाशिककरांनो याठिकाणी मी सेलिब्रिटी म्हणून आलेलो नाही… तुमचा माणूस म्हणून मी याठिकाणी आलेलो आहे… चांगल्या माणसांच्या बाजूने राहायचं आहे आणि वाईट माणसं जरी आपली नातेवाईकअसतील, मित्र असतील तरी ती वाईटच आहेत… त्यांना आपण जगू देणार नाही आणि झाड तर मरु देणारच नाही…
10 वर्षांची झाडं तोडणार आणि साधू संतांची व्यवस्था करण्यासाठी झाडे तोडणार आहोत… असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर सयाजी शिंदे म्हणाले, ‘चांगली माणसं ही साधू – संत असतात. एका जागेत 10 माणसांची गरज असताना तिथे हजार माणसं आली तर, ते साधू – संत नसतात… अशा माणसांनी येथे येऊन नाशिकची वाट लावू नये… सर्व नाशिककरांनी एकत्र आलं पाहिजे… येथे गवताची काडी देखील तुटली नाही पाहिजे… हा महाराजांचा अपमान आहे… हा तुकोबांचा अपमान आहे… तुकारामांचा अपमान आहे… या सगळ्यांनी जे सांगितलं आहे तेच सर्व आपण पूढे घेऊन जात आहे… आम्ही फसणार नाही आणि तुम्हाला फसवू देणार नाही… ‘
पुढे सयाजी शिंदे म्हणाले, ‘साधू आले गेले मेले माहित नाहीं पण झाडे राहिली पाहिजे… झाडाची व्याख्या करणे अजून राज्य सरकारला माहीत नाही.. सगळ्यात जास्त वड आपल्या सरकारने तोडले… गिरीश महाजन माझी तुमच्यासोबत दुश्मनी नाही आणि झाली तरी काही हरकत नाही… केंद्र सरकारनेच सर्वात जास्त झाडं तोडली… असं देखील सयाजी शिंदे म्हणाले…
