Raj Thackeray : नावातच जरबही आणि एक जादुई… राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मराठमोळ्या अभिनेत्रीची लक्षवेधी पोस्ट
Raj Thackeray : राज ठाकरे यांना पहिल्यांदा भेटल्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीला आलेला अनुभव, पोस्ट करत म्हणाली, 'नावातच जरबही आणि एक जादुई...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा...

Raj Thackeray : मराठी कलाकारांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कायम पाठींबा असतो. अनेक मराठी सिनेमांच्या टीझर आणि ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात राज ठाकरे उपस्थित असतात. तर राज ठाकरे यांना भेटण्यासाठी अनेक कलाकार देखील त्यांच्या निवासस्थाना पोहोचतात. नुकताच अभिनेत्री धनश्री काडगांवकर हिने राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. धनश्री काडगांवकर हिचा ‘लास्ट स्टॉप खांदा’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. तर, सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेत्री आणि सिनेमाच्या संपूर्ण टीमने राज ठाकरे यांची भेट घेतली.
धनश्री काडगांवकर हिने खास पोस्ट शेअर करत, राज ठाकरे यांना भेटल्यानंतर आलेला अनुभव सांगितला आहे. अनेक वर्ष ज्या क्षणाची वाट पाहात होते, तो क्षण आज माझ्या आयुष्यात आला.. शर्मिला वहिनींची भेट झाली…
View this post on Instagram
कलाकारांवर प्रामाणिक प्रेम करणारे आणी सदैव मराठी कलाकारांच्या पाठीशी उभे राहणारे, ज्यांच्या नावातच जरबही आहे आणि एक जादुई करिष्मा आहे, तीच जरब,तीच जादू आज मा. राज साहेब ठाकरे ह्यांना प्रत्यक्षात भेटल्यावर दसपटीने जाणवली…. साहेबांनी “ लास्ट स्टॉप खांदाच्या “ संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप खूप आभार.. सध्या धनश्री हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
‘लास्ट स्टॉप खांदा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात धनश्री काडगांवकर मुख्य भूमिकेत देसणार आहे. एवढंच नाही तर, Maharashtrachi Hasyajatra फेम प्रभाकर मोरे यांच्यासोबतचं ‘अगं शालू…’ हे गाणंही तुफान व्हायरल झालं आहे. चाहते देखील आता सिनेमाच्या प्रतिक्षेत आहे. सिनेमा 21नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
सिनेमात धनश्री काडगांवकर हिच्यासोबत प्रभाकर मोरे, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, निखिल बने, श्रमेश बेटकर, जुईली टेमकर… हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे…
धनश्री हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत धनश्री हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘तू चाल पुढं’ मालिकांमुळे धनश्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.
