AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girija Oak : ‘नॅशनल क्रश’च्या टॅगचा गिरिजा ओकला बसलाय मोठा फटका, तिच्यासोबत नेमकं घडतंय तरी काय?

Girija Oak : एका रात्रीत मिळालेला 'नॅशनल क्रश' टॅग गिरिजा ओकला पडलाय महागात... अभिनेत्रीचं मोठं नुकसात, तिच्यासोबत नेमकं घडतंय तरी काय? गिरिजा हिच्याकडून अखेर खंत व्यक्त...

Girija Oak : 'नॅशनल क्रश'च्या टॅगचा गिरिजा ओकला बसलाय मोठा फटका, तिच्यासोबत नेमकं घडतंय तरी काय?
अभिनेत्री गिरिजा ओक
| Updated on: Apr 11, 2026 | 10:33 AM
Share

Girija Oak : मराठमोठी अभिनेत्री गिरिजा ओक हिने फक्त मराठीच नाहीतर, बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारणारी गिरिजा आता ‘नॅशनल क्रश’ देखील झाली आहे. एका रात्रीत ‘नॅशनल क्रश’ म्हणून प्रसिद्धी झोतात आलेल्या गिरिजा हिने त्या दिवसांनंतर झालेल्या बदलांवर मोठं वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, गिरिजा हिने नुकताच अमोल परचुरे यांच्या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्री मोठे खुलासे करत एक खंत देखील व्यक्त केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा रंगलेली आहे.

मुलाखतीत गिरिजा हिला, ‘नॅशनल क्रश या टॅगमुळे हाती काय लागलं…?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘नॅशनल क्रश या टॅगमुळे मला फॉवोअर्स मिळाले…ती गोष्ट हाती लागली… यापेक्षा एक मजेदार अनुभव मला आला आणि तो म्हणजे, याकडे जास्त लक्ष दिलं तर, लोकं म्हणतात आली मोठी… आता डोक्यावर बसेल… झाडावर चढेल… आणि जर याला महत्त्व दिलं नाही तर, लोक म्हणतील, तू लक्ष का देत नाहीस, तुझी मेहनत आहे यामध्ये… याचं श्रेय तू घेतलंच पाहिजे…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘नॅशनल क्रश या टॅगमुळे मी अमराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोतले. त्यांनी माझे सिनेमे पाहिले… जे मला ओळखत नव्हते ते देखील मला ओळखू लागले… याचा मला आनंदच आहे..’, पण या टॅगमुळे गिरिजा हिला मोठा फटका देखाल बसला आहे… ‘नॅशनल क्रश’ या टॅगमुळे जाहिरातींची कामं गेली… असं देखील अभिनेत्री म्हणाली.

‘जाहिरातींसाठी कामं येणं आता कमी झालं आहे.. मी 100 पेक्षा अधिक जाहिराती केल्या आहे. जाहिरातींमध्ये जास्त प्रसिद्ध आहेत आणि जे फार नवीन देखील नसतात, त्यांना काम मिळतं. पण अचानक तुम्हाला खूप लोकं ओळखू लागल्यानंतर, ती घरातील एक सामान्या स्त्री वाटत नाही… ‘नॅशनल क्रश’ या टॅगमुळे जाहिरातींचं काम कमी झालं आहे.’ अशी खंत गिरिजा ओक हिने व्यक्त केली आहे.

Follow Us
बड्या NCP नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्री...
बड्या NCP नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्री....
कर्नाटकात मोठा उलटफेर, सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच ठरला नवा...
कर्नाटकात मोठा उलटफेर, सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच ठरला नवा....
केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, नीट परीक्षेसाठी थेट लष्कर मैदानात
केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, नीट परीक्षेसाठी थेट लष्कर मैदानात.
बनावट सही करून खातं साफ; महिला डॉक्टरची लाखोंची फसवणूक
बनावट सही करून खातं साफ; महिला डॉक्टरची लाखोंची फसवणूक.
मोठी बातमी! कोल्हापुरात गंभीर प्रकरणी भाजप नेत्याला अटक, थेट राजस्थान
मोठी बातमी! कोल्हापुरात गंभीर प्रकरणी भाजप नेत्याला अटक, थेट राजस्थान.
अगोदर थुंकला अन् बनवली रोटी, मुंबईत हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार
अगोदर थुंकला अन् बनवली रोटी, मुंबईत हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार.
Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट..
Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट...
17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार....
17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार.....
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला.
मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक
मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक.