AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजा सावंतचं ‘या’ मराठी अभिनेत्यासोबत डेटींग, वाचा नक्की काय आहे भानगड?

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहऱ्यापैकी एक अशी ओळख असणारी अभिनेत्री पूजा सावंत सध्या चांगलीच चर्चेत आहे. पूजा सावंत ही महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर या डान्स शोमध्ये जजची भूमिका साकारत आहे. नेहमी आपल्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असलेली पूजा सावंतच्या अफेअर्सच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. पूजा ही एका मराठी अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर […]

पूजा सावंतचं 'या' मराठी अभिनेत्यासोबत डेटींग, वाचा नक्की काय आहे भानगड?
| Updated on: Feb 13, 2021 | 10:35 PM
Share

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहऱ्यापैकी एक अशी ओळख असणारी अभिनेत्री पूजा सावंत सध्या चांगलीच चर्चेत आहे. पूजा सावंत ही महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर या डान्स शोमध्ये जजची भूमिका साकारत आहे. नेहमी आपल्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असलेली पूजा सावंतच्या अफेअर्सच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. पूजा ही एका मराठी अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. (Pooja Sawant Dating With  Gashmeer Mahajani Trends On Social media)

हिंदीसह मराठी सिनेसृष्टीत डँशिंग पर्सनॅलिटी अशी ओळख असणारा गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. व्हॅलेंटाईन वीक सुरु असतानाच या दोघांमधील काही खास मॅसेजेस समोर आले आहेत. यात गश्मीरने पूजासाठी काही तरी खास प्लॅन केल्याचेही म्हटलं आहे.

गश्मीर महाजन आणि पूजा सावंतची चॅट

गश्मीर – कशी आहेस? उद्याचा काय प्लॅन काय? काही स्पेशल

पूजा – उद्या व्हॅलेंटाईन डे आहे. माझी फॅमिली हाच माझा व्हॅलेंटाईन असल्याने मी त्यांच्यासोबतच वेळ घालवणार आहे.

गश्मीर – चल उद्या भेटू, मला तुला एक सरप्राईज द्यायचंय.

पूजा – तू मस्ती करतोस का?

गश्मीर – नाही खरचं सांगतो.

पूजा –  मी खरच फार उत्सुक आहे. आताच सांग ना प्लीझ

गश्मीर – उद्या व्हॅलेंटाईन डे आहे. उद्या वेळ काढ. काहीतरी स्पेशल आहे.

पूजा – वाट बघते.

ही चॅट्स पुजा आणि गश्मीरमधील आहे. त्यामुळे त्या दोघांचं काहीतरी सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. पण हा नेमका प्लॅन काय याची अद्याप काहीही माहिती नाही.

गश्मीर आणि पूजामधील हे चॅट पाहिल्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पण ही चॅट एखाद्या चित्रपट आणि वेबसीरीजच्या प्रमोशनसाठी करण्यात आले आहेत का? हे मात्र गुलदस्त्यात आहे. त्यामुळे याची खरी माहिती उद्याच प्रेक्षकांना कळणार आहे.

दरम्यान पुजाने काही वेळापूर्वीच ‘प्रेमाची व्याख्या …… माहीत आहे कोणाला ?#waitfortomorrow’ असं कॅप्शन देत एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच आता ही चॅट समोर आल्याने हा एखादा पब्लिक स्टंट असल्याचे बोललं जात आहे. (Pooja Sawant Dating With  Gashmeer Mahajani Trends On Social media)

संबंधित बातम्या : 

Photo : पूजा सावंतचं व्हेकेशन मूड, पाहा फोटो

Follow Us
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...